बाईचा ऑरगॅझम



नाही. हा अज्जिबात घाणेरडा विषय नाही. टाकून देण्यासारखा किंवा सोडून देण्यासारखा विषय नाही. स्त्रीचा देह हा केवळ उपभोगाचे साधन असावे आणि तिला तिला तिचे शरीर उद्दिपित करण्यासाठी हाती काही असू नये ह्यासाठी खतना करण्यासारख्या काही अनिष्ट क्रूर प्रथा अजूनही अस्तित्वात आहेत, हे फार भीषण आहे. शारिरिक आनंद स्त्री तिचा तीही मिळवू शकते, त्यावर सुरी फिरवण्यासाठी म्हणूनही खतना केला जात असेल. सेक्सशी संबंधित ज्या कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य तिला आहे ते छाटून टाकण्यासाठी हे केलं जातं. खरंच स्त्री सेक्स संबंधित एक उत्कट अनुभव पुरूष नसतानाही तिचा तिला देऊ शकते का.. हो. देऊ शकते.
पाळी आल्यावर मला पहिल्यांदा शिकवलं गेलं की पुरषांना आपल्या शरीराला हात लाऊ द्यायचा नाही. मी म्हंटलं बर. पण आपण घरी आपल्या पालकांना जे प्रेमाने अगदी विश्वासात कबूल करतो त्याबरहुकूम आपण वागतोच असं नाही.
कॉलेज बंक मारून एका मैत्रिणीच्या घरी दुपारी गेलो होतो. मी, ती आणि तिचा बॉयफ्रेंड. तो फार म्हणजे फार देखणा होता. आमच्या कॉलेजमध्ये पेजर आणणार्या मुलांपैकी तो पहिला असेल. त्याच्याकडे पेजर होता आणि पजेरोही होती. माझी मैत्रीण अतिशय सुंदर होती. मी गावठी. खरंच प्रचंड गावठी होते तेव्हा आणि अडाणीही होते हाहा. मला बॉयफ्रेंड नव्हता. तो हवा आहे, यासाठी मी डेस्परेटही नव्हते. तिच्या घरी गेल्यावर पहिल्यांदा व्हिस्की समोर आली. तोवर मी कधी कधीही प्यायलेली नव्हते. कधीच. पण मग टाईट होण्यासाठी प्यायचं असं एक विचित्र खूळ आमच्या तिघांच्या डोक्यात होतं आणि मी आणि ती नाक दाबून, चेहर्याचे विचित्र आकार करकरत प्यायलो. तो सिझन्ड असल्यासारखा पीत होता. थोड्या वेळाने फार वेगळ्या जगात गेलो आम्ही. तरंगायला लागल्यासारखं मला वाटायला लागलं. आजूबाजूला पाहते तर माझी मैत्रीण गायब झाली होती. तिला उभं राहता येत नव्हतं म्हणून ती आत जाऊन बेडरूममध्ये बेडवर जाऊन लुडकली होती. मी तिच्यापाशी जाऊन उभी राहिले आणि मग मला भडभडून आलं. पोटातून एक जोरद्दार कळ आली आणि मी ओकायला बाथरूमच्या दिशेने पळाले.
तिथल्या सिंकमध्ये प्रचंड ओकार्या झाल्या. आपण दुसर्याच्या स्वच्छ बाथरूमची वाट लावतोय, हे तेव्हा काही कळलं नाही. मी सिंकवरतीच हात दाबून उभी होते. तेवढ्यात माझ्या पाठीवर एक हात फिरू लागला. मी वळून पाहिलं. तर तिचा तो बॉयफ्रेंड उभा होता. त्याने मला बाथरूममधल्याच भिंतीला टेकवून उभं केलं आणि माझ्या चेहर्यावरचा घाम हाताने पुसला.
मी त्याच्या मिठीत कशी काय गेले ते काही मला आठवत नाही. त्याने मला मिठीत का घेतलं ते त्यालाही कळलं नसेल. पण मग नंतर त्याने मला किस केलं. खूप वेळा. It was beautiful. हे माझं पहिलं किस. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत. हममम.. life you know..
तेवढंच त्यापुढे काही नाही. मग मी शिस्तीत घरी आले. मग तो शिस्तीत तिचाच बॉयफ्रेंड होता. तो देखणाबिखणा होता पण मला आवडायचा नाही. न आवडणार्या पुरषाकडून किसचा पहिला अनुभव हे इतकं विनोदी माझ्याच बाबतीत व्हायला हवं होतं का? पण ते किस उत्कृष्ट होतं त्यासाठी मी मनोमन त्याचे कित्येकदा आभार मानलेले आहेत. त्याने किस केलं तेव्हा माझ्या शरीरात जे काही झालं म्हणजे एकाच वेळी गरम आणि गार होणं इ.. असं पण असतं. हे असं होतं, हे लक्षात यायला लागलं.
मग विषय पुढे सरकला. आमच्या कॉलेजमध्ये माझी एक डॅंबिस मैत्रीण होती. तिने सरळ मॅस्ट्रबेशनचा विषय माझ्यासमोर काढला आणि नीट समजावला. मग शोध सुरू झाला आणि पुरूषांवर त्या एका अमेझिंग सुखासाठी अवलंबून राहण्याची कधी कधीही गरज राहिली नाही. आपण बायका कसल्या इक्विप्ड असतो. जसं पुरूष मॅस्ट्रबेट करू शकतात तेवढंच खरं आपल्याही बाबतीत हे शक्य असतं. आपल्याकडे हे सगळं श्शी.. इइ... मी नाही बै असं काही करू शकत..इतक्या गूळछाप पोरी असतात नं कधी कधी की त्याही अनेकदा समजतात की बौ सेक्समुळे आपल्याला गर्भधारणा होते म्हणजे त्या सेक्समध्ये पूर्ण सॅटिसफॅक्शन मिळतं. ऑर्गझमचा आणि दिवस जाण्याचा काही संबंध नाहीये तायांनो.
स्त्रियांचा ऑर्गझम हा विषय फार दुर्लक्षित आहे. त्या स्वत:हून त्याकडे कानाडोळा करतात. पुरूष जे काही करतात त्यातच स्वर्ग आहे, असं मानून चाललेल्या काही बापड्या. ऐसा नही होता है. बाईचं शरीर अमेझिंग आहे. बाईला पाळी येते, तिला गर्भ राहू शकतो आणि ती स्वत:च ऑर्गझमही मिळवू शकते. सेक्समध्ये ब्लोजॉब्ज साठी पुरूष खूप हातघाईला आलेले असतात. पण स्वत: खाली जायची वेळ आली की ते तेवढे कष्ट घेत नाहीत. आळशी मेले. त्यात त्यांना आवड असेल म्हणून त्यांनी ते केलं तरीही बाईचं मन काही लौकर भरत नाही आणि मग ते कंटाळतात. मन भरत नाही म्हणजे.. नाटक कसं करणार? स्त्रियांचा ऑर्गझम अचिव्ह करणं हे थोडं कठीण असतं. वेळ लागतो. पुरषांना जसा तो हमखास मिळतोच आणि तेही काही मिनिटांत, तसं बाईच्या बाबतीत अजिबात होत नाही. पुरषांचा ऑर्गझम झाट असतो. किती ब्लेस्ड आहेत ते याबाबतीत मायला.. आपलं तसं नै ना. एखादा फारच रसिक असेल तर तो बाईला स्वर्ग दाखवू शकतो. किधर है वो.. किधर है.. हाहा.
माझ्या एका मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला नेहमी विचारतो.. डीड यू गेट इट? अहाहा.. नशिबवान आहेस तू. ती नाही म्हणाली तर तो श्रद्धा व सबुरीने काम करतो. तिला खूष करणं त्याला महत्वाचं वाटतं. ते साध्य झालं नाही तरीही तो प्रयत्नं करतो. अमेझिंग आहे तो माणूस.
पुरूषांचं एकदा का काम फत्ते झालं की त्यांना डाराडूर पंढरपूर झोप लागते. आता हा झोप लागणं प्रकार जो आहे तोच बाईने मॅस्ट्रबेट केल्यावर तिला जेव्हा ऑर्गझम येतो त्यानंतर होतो. अगदी छोट्या बाळाला लागावी तशी गाढ झोप क्षणात लागते. पुरषांकडून जे सुख मिळतं ते स्त्रीला मॅस्ट्रबेट करताना मिळणार नाहीच. पुरषांना रीप्लेस करूच शकत नाही आपण. पण अंगातून सणसणत जाणार्या विजांचा अनुभव घ्यायचा असेल तर बाईला हे ऑर्गझम कसं मिळवायचं हे माहीत असायलाच हवं. त्यासाठी काही आपण कुणावर अवलंबून नाही.
माझ्या बर्याचश्या मैत्रिणी ज्या विवाहीत आहेत वा नाहीत, त्यांना हे कसं करायचं ते माहीत नाही. ऑर्गझम मिळतो म्हणजे नक्की काय होतं आणि त्याने कसं वाटतं, हा प्रश्नही कित्येक जणींनी विचारला आहे. ते तसं सांगता येत नाही. आपली गुगल आई आहे आपल्याकडे. पॉर्नच्या लाखो साईट्स आहेत. इच्छा तिथे मार्ग, हात लावीन तिथे सोनं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अरंंरं रं.. श्या हे मला काय लिहायला लावलंत. तुम्ही मेहनत करा बौ त्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरला सांगा कष्ट करा कष्ट करा. It's Amazing.
शरीर सुखामध्ये ऑर्गझम हा महत्वाचा टप्पा आहे. जोडप्यांमध्ये पुरषांना ते सुख मिळतं पण स्त्रिया अनेकदा त्यापासून वंचित राहतात ह्याचं कारण ते स्त्रियांना मिळवून देण्यात समोरच्या पुरषाची उदासिनताही असते. कैकदा त्याने तसा प्रयत्न करूनही ते मिळतंच असंही नाही. पुरूषांची कामवासना प्रबळ झाल्यावर त्यांच्या आसपास स्त्री नसताना ते मास्ट्रबेशन करून जी इच्छापूर्ती करतात तेच करण्यासाठी स्त्रियांचे शरीरही स्वयंपूर्ण असताना घोडे अडण्याची गरज नसते. पण तरी पुरूष असले तरीही आणि नसेल तरीही जो एक रितेपणा येतो उरतो, तो का?
स्त्रियांना हे सुख तिच्या जोडीदारानेच दिले तर ते स्वर्गसुखच म्हणायला हवे. ह्यासाठी दोघांमध्ये संवाद आणि परस्परांना समजून घेण्याची इच्छा असणं महत्वाचं आहे. सेक्सची इच्छा जशी आपल्याला होते तशी ती आपल्या स्त्री जोडीदारालाही होत असेल, ते जाणून घेणं व पूर्ण करणं महत्वाचं आहे. बर्याच बायकांचा याबाबत कोंडमारा होतो आणि त्या अतिशय वाईट अवस्थेतून जातात. आपला जोडीदार हे समजूनच घेत नसेल, तर त्याने अजून भाजत राहते. मग मास्ट्रबेशन करूनही मिळणारे तात्पुरते ऑर्गझम हे फार काळ मनाला शांत ठेऊ शकत नाही. यासाठीच पुरूष महत्वाचा.
अनेकदा आपल्या डीस्टर्ब सेक्स लाईफबद्दल स्त्रिया आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ते मात्र त्याकडे चक्क दुर्लक्ष करतात. मग अश्या स्त्रिने तिचे सुख बाहेर शोधले तर त्याने येणार्या अपराधीपणाचा किंवा लोकांत छी थू होण्याचा आणि शिवाय जोडीदाराच्या नजरेतून उतरण्याच्या भयाचा सामना तिलाच करावा लागतो. येणकेणप्रकारेण तिच्या आयुष्यात जो पुरूष आहे त्याच्याकडून तिची कामेच्छा पूर्ण होणं हे महत्वाचं असल्याचं अधोरेखीत होत राहतं हे दुर्दैव आहे. स्त्रियांची ही कोंडी जर पुरषास ओळखता येत नसेल किंवा तो त्याकडे दुर्लक्ष करून तिचा कोंडमारा करत असेल, तर त्याचे तिच्यावर प्रेम नाही, हा साधा निष्कर्ष काढता येतो. हे नको असल्यास पुरषांनी कंबर कसली पाहिजे. नंतर ती स्त्री हातची बाहेर गेल्यावर तिला दुषणे न देता आपण कमी पडल्याचं मान्य करण्याचा समंजसपणा निदान अंगी असला पाहिजे. जे हातून गेलं आहे ते परत जिंकता येईल का, हा विचार पाहिजे.. तर तू पुरूष इ. हो हे खरं आहे. काही झालं तरी अजूनही प्रेम आहे, हे बोलत तोंडाला पानं पुसण्याची खरीच गरज आहे काय? स्त्रियांना ऑर्गझमसाठी पुरषांवर अवलंबून राहण्याची गरज जरी नसली तरी पुरषाची आपल्याला गरजच नाही, असं आहे का? तर नो नो नो.
पुरूषाचं आपल्या आयुष्यातलं स्थान अनन्यसाधारण आहे. पुरूष आसपासात नसताना किंवा जो आहे त्याला आपल्याला ऑर्गझम देणे शक्य होत नाहीये तर ते फार न ताणता ते मिळवण्यासाठी आपण मास्ट्रबेट करतो. पण पुरूष जे प्रेम देतो, जो स्पर्श दिलासा संवाद देतो, जे काही चावट पांचट बोलतो.. ते रेशम फक्त तोच किडा देऊ शकतो. ते घडत असताना ज्या भावना उचंबळून येतात ते मास्ट्रबेट करत असताना जे वाटतं त्याच्यापेक्षाही कैक पटीने सरस ठरतात हे नाकारता येत नाही. फोअरप्लेमध्ये खूप काळ रममाण होऊ शकणारा पुरूष मिळणं ही प्रत्येक स्त्रीची फॅंटसी असते. आपण ज्या जश्या आहोत त्यावर जीवटाक प्रेम करणार्या पुरषासाठी बै जीव पण दील. भेटणं, बोलणं, एकमेकांध्ये मन गुंतत जाणं ह्यातली नशा कधी संपूच नये असं वाटत राहतं. खूप वेळ चालणारं किस हेही पुरेसं असतं स्त्रीकरिता. मग तिचं सजणं, लाजणं, अंग चोरणं सुरू होतं. ह्या सगळ्यात किती सेक्स भरलेलं आहे हे घायकुतीला आलेल्या पुरषांच्या किंवा एकदम ड्राय असलेल्या पुरषांच्या नजरेस कसं काय पडावं? असे जोडीदार मिळाले की रसरसून वहात असलेली स्त्री कोमेजून जाते. जगायची इच्छा संपते. तिच्यातलं औदासिन्य तिच्या वागण्या बोलण्यात दिसण्यात पसरू लागतं आणि मग तिला सतत हाच प्रश्नं पडू लागतो, की का हे माझ्या नशिबात. काय आहे माझी चूक? संताप वाढायला लागतो. जोडीदाराबद्दल तिरस्कार निर्माण होतो. ती मिटून जाते.
काही पुरषांना वाटतं की त्यांनी सेक्स केलं की स्त्रियांना सुख मिळतं. ह्या गैरसमजात अनेक वर्षं वाहून जातात. स्त्रीच्या शरीराशी सेक्स करणं फार सोपं आहे. तीन मिनिटं लागतात त्याला फार फार तर. तिच्या मनाशी सेक्स करणं आणि त्यात आपला फॉर्म टिकवून ठेवता येणं हे जमणार का? तिथे व्हियाग्रा काम करत नाही. जिथे मन जुळत नाही तिथे ऑर्गझम येणं अशक्य आहे बाईला. 
स्त्रियांच्या अपेक्षा फार आहेत, असं म्हणाल. त्यांना ऑर्गझम पण पाहिजे त्यांना रोमॅंन्स पण पाहिजे. हो, आहे तसं. हे सारं जमणं ही एक कला आहे. निदान त्यासाठी समोरचा पुरूष प्रयत्न करतो आहे हे पाहूनही खूष होणार्या आम्हां स्त्रियांच्या अपेक्षा खूप जरी असल्या तरी त्या पूर्ण करण्याचा खर्च फार महाग नाही हे लक्षात येईल नशिबात असल्यास.

Comments

  1. लयभारी

    ReplyDelete
  2. छान...अस मन मोकळेपनाने बोलनारी ताई असावी.....

    ReplyDelete
  3. mala vaicharik orgasm aala!

    ReplyDelete
  4. अप्रतिम.आज लग्नाला १५ वरषे झाली पण तिचा ओरगैजम झाल्याशिवाय मी सेक्स एकदाही नाही थांबवला. नेहमी एकच ध्येय. खुश आहोत

    ReplyDelete
  5. Ky apratim lihilay he tu... Mastch.. Kharch kahi bayka mhatarya houn marun jatat tri tyana orgasm alela nasto he eka sarvekshanamdhe adhalal ahe. Ani purushanch kiti bhari ki te 2-3 min mdhe krun mokle hotat. Tashi mi khup nashibvan ahe jshi tuzi ti maitrin ahe.. Maza bf pn mala vicharato baby u get it... Hahaha...agadi asch.. Pn chhan lihilay.. As kahitri asel tr backward thinking krnare baykanchi ani purushanchi akkal thikanyavr yeil..

    ReplyDelete
  6. माझं ऑरगॅझम झाले नाही तर कसं वाटतं हे मला माहीत आहे म्हणून मी माझ्या जोडीदाराच्या ऑरगॅझम ची काळजी घेतो

    ReplyDelete

Post a Comment