माझ्यावर लिहलेली एकही कविता असू नये?

मला उपभोगावसं वाटू नये एखाद्या पुरषाला, मला पाहून एकाही पुरषातली वासना जागृत होऊ नये, मला पाहून कुणालाही माझा पाठलाग करावा वाटू नये, माझ्याकडे बघत रहावं असं वाटू नये, मला घट्ट मिठीत धरावं, माझं कडकडून चुंबन घ्यावं व मला पाहून एखाद्याच्याही जिवाचं पाणी पाणी होऊ नये, माझ्या आठवणीने साला एकाही पुरषाची झोप हराम होऊ नये किंवा माझ्याशी लग्न झालं नाही म्हणून एकालाही हळहळ वाटू नये, मी म्हणजे फक्त एक मैत्रीण, बहीण बस्स.. ह्यापलिकडे माझ्याकडे पाहून एकही लालचुटूक लसलसणारी भावना एकाही पुरषाच्या मनात येऊ नये, मला पाहताच एकाच्याही अंगावर रोमांच उभे राहू नयेत का? माझी वाट पाहण्यासाठी कुणीच कोपर्यावर थांबलेलं असू नये.. मी कुणाला का आवडत नाही?
अनेक मित्र असतील आसपास. पुरषांचा खूप गोतावळा असेल पण मला 'त्या' नजरेने बघणारं कुणीच नाही, असं का?
असाही सल कित्येक स्त्रियांच्या मनात असेल. आपण डीझायरेबल असावं असं बहुतांश स्त्रियांना वाटतं. मग ही मनात उगवून वेळी अवेळी कोमेजत राहणारी फुलं, भावनांचा कलकलाट कश्या काय शांत करत असतील स्त्रिया... पुरषांला स्त्री हवी असते. तितकीच  भयंकर तीव्रतेने स्त्रीलाही पुरूष हवा असतो. पण तो जेव्हा मिळत नाही तेव्हा.. आपल्याला आवडणारा पुरूष तर फार लांबचाच आपण कुणालाच आवडत नाही, आपल्याला आजवर कुणीही प्रपोज केलं नाही, साधी लाईनसुद्धा कुणी मारली नाही, आपल्यासाठी राडे झाले नाहीत इतकच काय लग्नं झालं आहे पण नवरासुद्धा पहात नाही ही घुसमट कशी काय सहन होत असेल? अशीच घुसमट पुरषांचीही असेल, मी कुणाला का आवडत नाही !
माझ्या प्रेमात एकही कवी पडू नये? माझ्यावर लिहलेली एकही कविता असू नये?


Comments

  1. वास्तव परखड निर्भिड सत्य������

    ReplyDelete
  2. खरचंच अगदी बेसिक भावनांना तू हात घातलायस तू रेणुका.. की अशा भावना मनात असूनही ,अजूनही, म्हणजे सो कॉल्ड फ्री वातावरणातही व्यक्त होण्यासाठी काहींना संकोय वाटू शकतो नव्हे तो तसा वाटतोच... ज्यांना हे सारं मिळालं आहे किंवा आणि सारं मिळूनही मनासारखं काहीच नाही अशांच्या मनातली तगमग आपल्या पर्यंत पोहोचण अवघड आहे unless you sail in the same boat.

    ReplyDelete
  3. Chaitanya Vengurlekar21 November 2018 at 10:56

    काय लिहितेस तू...... वाः

    ReplyDelete
  4. हे अंतरंग खुले करणार्‍यांचा निचरा होता...

    ReplyDelete
  5. अरे जबरदस्त लिहिलंय ..... 👌👌👌

    ReplyDelete
  6. शब्दांच्या पलीकडले.....

    ReplyDelete
  7. असंही असू शकतं, हे वाचल्यावरचं कळलं..

    ReplyDelete
  8. अप्रतिम। निःशब्द।

    ReplyDelete
  9. कित्येक अव्यक्तांच्या भावनांना वाट करून दिली आहे आपण... खूप जणांच्या मनात असतं पण व्यक्त करणारे फार थोडे असतात.

    ReplyDelete

Post a Comment