स्तन से स्टन तक


माझी एक पीजी मैत्रीण मला म्हणाली होती, मी उद्यापासून रोज योगा करणार, रोज सूर्यनमस्कार घालणार, रोज शतावरी दुधात घालून पिणार मग माझे स्तन मोठे आणि सुडौल होणार. ह्यावर आम्ही फिदीफिदी हसलो होतो. सर्वसाधारण बरा छान होता तिचा उभार. पण हव्यास.. अजून हवं अजून हवं.
अजून तो उभार कसा वाढेल किंवा तो वाढवल्यामुळे काय होणार होतं किंवा जे आहे ते पुरेसं का वाटत नाहीये, किंवा तुझा बॉयफ्रेंड स्तनवेडा आहे का.. की तो फार ऑब्सेस्ड आहे स्तनांविषयी? की त्याला उच्च टोलेजंग स्तन असलेली कुणी दुसरी मैत्रीण आवडते म्हणून तुलाही तसेच डौलदार कबुतरी स्तन हवे आहेत, असे भयंकर घाणघाण प्रश्न विचारून मी तिला किमान आठवडाभर पिडत होते. इतकं की मी तिला 'ए स्तने', अशी काहीतरी विचित्र विकृत हाक मारीत असे. तेव्हा तिला हा विषय कुठून हिच्यासमोर काढला असे झाले होते. जे आहे त्याने तुझी सगळी कामं होतील, तुझा बॉयफ्रेंड प्रयोगशील किंवा एकूणच तुझ्याबाबतीत दिवाना असायला हवा गं... मोठे स्तन असलेल्या स्त्रियांचे बॉयफ्रेंडही कमाल बोअरिंग असतात त्यांना त्यामुळे अश्या स्त्रियांनाही त्यांच्यात सारे काही परीपूर्ण आहे असे वाटत नाही. तेव्हा बी हॅपी विथ व्हॉट यू हॅव, हे तिला सांगून सांगून मी तिच्या डोक्याचं भजं केलं होतं. तिने त्या शतावरीच्या बाटलीला की दुधाच्या पेल्याला नंतर तोंडसुद्धा लावलं नाही ना कधी तिला मी त्यानंतर सूर्यनमस्कार घालताना पाहिलं. खरं तर तिला जे वाटतं होतं ते तिने करायला हवं होतं आणि माझ्या पिडण्याकडे तिनं पूर्ण दुर्लक्ष करायला हवं होतं. पण इथेच तर खरी मेख आहे. आपल्याला नक्की काय हवं आहे, हेच मुळात स्त्रिया शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि जे डीमान्डमध्ये आहे ते सारे सौंदर्य निकष आपल्यात असायला हवेत असा त्यांचा पागल अट्टहास असतो.
डीमान्ड आपण तयार करायची असते. ह्याचीच डीमान्ड जास्त आहे आणि ती सारी वैशिष्ट्य माझ्यातच केवळ  आहेत, हे दाखवण्यात बर्याच स्त्रिया कमी पडतात. त्यांच्या स्त्रीत्वातली विविध बारीक सारीक अस्त्र त्यांना नीट वापरता न आल्याने ती तशीच गंजून जातात. कारण फक्त मोठे स्तन ह्यावर जसे पुरूष अडून बसलेले असतात तश्यात स्त्रियांनाही केवळ तेच एक सौंदर्याचे बलस्थान आहे, असे वाटत असते.
बायकासुद्धा स्तनांवर इतक्या अडकलेल्या आणि साला इतक्या ऑबसेस्ड असतात की पुरषांना त्याबद्दल वाटणारा ऑवव अगदीच समजून घेता येण्यासारखा आहे. 
पण सतत कुणी स्तनांकडेच पहात राहिलं ना की त्यांना आठवण करून द्यावी वाटते अहो मला तोंडही आहे. तोंडाकडे पाहून बोला. काही पुरषांना स्तन मोठे की लहान हे काही मॅटर करत नाहीत. ते फक्त छातीकडे पाहूनच बोलतात. आमच्या ऑफीसमध्ये एक सिनियर होते असे. फक्त छातीकडेच पाहून बोलायचे. म्हणजे छातीकडे पाहताना ते पहिल्यांदाच ईजिप्तच्या पिरॅमिडकडे पाहून अवाक झाले आहेत सदृष भाव डोळ्यात असत. जगातलं आठवं आश्चर्य पाहिल्यासारखे. कायम विस्फारलेली नजर..ते छातीच्या पलिकडे काय आहे हे सतत स्कॅन करत असतात, असं सगळ्याजणी म्हणायच्या. त्यांना ऑकवर्ड करण्यासाठी आपणही त्यांच्याकडे विस्फारून पहात रहावं असं त्यांच्याकडे खालीही काही नसावं ना वरती तसं काही होतं. म्हणजे ते एका नॉर्मल माणसासारखे दिसायचे. अगदी मोठ्ठं वयबिय असलेले. कधी काय करायचे की आपण जिथे बसलो आहोत तिथे मागे अश्या एंगलमध्ये उभे रहायचे की तिथून सगळा त्यांना बघायचा असेल तो नजारा दिसेल. जाम संताप व्हायचा. पण ते सगळ्यांकडेच तसे पहायचे, ह्याच्या चर्चा व्हायच्या त्यामुळे एकप्रकारची कणव वाटत राहिली त्यांच्याबद्दल. असं वाटलं की he just can't help it. जांदे.

Comments

  1. स्तन आकर्षक असावेत असा अट्टाहास असणं चुकीचं नाहीये आणि सगळी एकक स्त्री बाबतीत स्तन आणि पृष्ठभाग ह्यावर लावली जातात, पुरुषांच्या बाबतीत उंची आणि सुडौल पिळदार शरीर

    ReplyDelete
    Replies
    1. असा अट्टहास असणं चुकीचं वाटतं. निसर्गाने जे दिलेलं आहे ते मनमोकळेपणाने स्वीकारता आलं पाहिजे. अट्टहासाने न्यूनगंडाची भावना उत्पन्न होऊ शकते. आयुष्यात बाकीचे ताण कमी असतात का की हा जास्तीचा ताण बाळगण्याची गरज आहे? शरीर सौंदर्याबाबत असलेले हे अट्टहास फक्त स्तनांबाबतच नाहीत तर उंची, रंग, वजन, हसणं, नाक, शेपली कुल्ले ह्यासगळ्याच बाबत न संपणारे आहेत. जे शरीर आहे ते व्यायाम आणि चांगला आहार विचार ह्याने उत्तम घडवता येणे व राखणे हे सगळ्यांच्या हाती आहे. असे उत्तम व्यक्तिमत्वही कुठेही चमकून दिसते आकर्षक वाटते.

      Delete

Post a Comment