तिथे जागा फार छोटी ए

त्याचं तिच्यावर मोक्कार प्रेम. ती काही अजून पटलेली नाही. नाक्यावर बसून तिची एक छबी दिसेल म्हणून तळमळणार्या ह्या रोमियोने बेक्कार मारही खाल्लेला आहे. पण त्याची अक्कल शेणगोठा करायला गेलेली आहे. त्याच्यासोबत नाक्यावर बसणार्या त्याच्या दोस्तांनाही बर्यांचदा फटके पडलेले आहेत मित्रापायी. ते समजावतात, सांगतात अरे पळून जायला खूप छोटी गल्ली आहे.. लै मार पडेल. ईज्जत जाईल. तोंड फुटलं तर हीच काय अजून कुणीही आयटम मिळणार नाही. पण आशिक बहिरा असतो. तो जगाशी नाही फक्त तिच्याशी बोलत असतो. तिला ऐकू येवो न येवो. 


Image by Vikas Khot
..

मी देऊळ देवळातला भक्तही
कळसावरून उडणारा पतंग, मी मलंगही
विटेवरच्या तुझ्यामाझ्या चार पावलांपर्यंत पोहोचताना
वाटेवरच फाटतो सांडतं माझं रक्तही
मोठा भारावून टाकणारा असेल तो प्रसंग
जेव्हा फायनली भेटशील तू मला
गे रखुमाई
रोल मध्येच सोडून जाऊ नकोस
तिथे जागा फार छोटी ए

संध्याकाळी होतं जडजड
झाकणं उघडा उडू दे अत्तर
हे अत्तर फडताळावरती
सांडून जाईल जपले तू जर
तिथे जागा फार छोटी ए

तुला वगळतो माझ्यातून
मग
हातात काढूनच घ्यावा लागतो मेंदू
साल्याचा आकार झाटभर आणि आवाज हातभर
समजू शकतो ही तडफड
तिथे जागा फार छोटी ए

डोक्यावर बाटल्या फुटल्यावर
नडग्यांवर लाथा पडल्यावर
कपाळातून रक्तखोक
ओठ टर्कन फाटल्यावर
शरीर शरीर रहात नाही,
बांधली जाते जखमफुलांची पुडी
सोबतीला दोस्तांच्या शिव्यांच्या लडी
भेंच्योत सोड तिचा नाद मरशील फुकट
कळ दाखवून दिसतेच असं नाही
लवड्या पळ पळ
तिथे जागा फार छोटी ए

समजेल का तुला एकांतातली शांतता की..
शांततेला मानशील ऑर्डिनरी मुलींसारखा च्युत्याटिक अबोला ?
समजेल का तुला
शांततेत जाणवतात घंटानादाचे व्हायब्रेशन्स की..
FUCKत उचलशील शांत गाभार्यात विकले जाणारे गार्हाण्यांचे सेशन्स ?
मी नास्तिक तरी स्वस्तिकाच्या बैठकीपुढे होणारा नतमस्तक
समजेल का तुला ही आस्तिकता माझी ?
तिथे जागा फार छोटी ए


हे काही मुलींनाच समजेल, तुलाच तूच ती समजणारी
कारण कळण्याच्या जागा प्रयत्न करून हुडकाव्या लागतात
ते कष्टाचं कामे
सगळ्यांना सामावून घेईल
इतकीही जागा नसते पुरषांच्या हृदयात
तिथे जागा फार छोटी ए

धडधडणार्या नाळांचं गाठोड कापून
निष्पाप डोळ्यांच्या कण्हणार्या किळसवाण्या
कबुतराची मान पिरगळून संपवून टाकणार
हृदयातली घुटर गूं घुटर गूं
हृदयात गांठळलेलं
मी बोलून टाकणारे बेधडक
बाहेर काढून टाकणार एक काटेरी ब्लॉक
तुला सांगितलंच नाही तर तसाही मरून जाईन गं मी
एय.. येऊ दे ना आतआत
तिथे जागा फार छोटी ए

Comments

  1. Renuka once again rock on..
    Ur writing is very very dear to all of us.. & fan like me..

    ReplyDelete

Post a Comment