ये क्या हुवा.. क्यू हुवा.. कब हुवा..

फेसबुकवरचं जगच वेगळं आहे. इथे काही होतं काहीही.
एखाद्याकडून लव्ह आलं की आपले पुढचे काही दिवस उगाच चांगले जातात. उगाच. मघाचं आलेलं हसू मग परत उगाच उगाच चेहर्यावर येत राहतं. मग ते नोटिफिकेशन आपण पुन्हा पुन्हा उघडून बघत बसतो.
आपण परत प्रेम किंवा प्रेमभंग लडबडीत पोस्ट टाकतो. पुन्हा लव्ह वाला बदाम पडतो. तो पाहून आपले डोळे स्क्रीनतरफ ताणून आतल्या गोट्या त्या बदामाचा एक चुम्माही घेऊन येतात.
मग असं सतत होत राहतं. एक दिवसाआड लव्ह लव्ह लव्ह. मधल्या दिवशी लाईक किंवा काहीच नाही असं. मग आपण हळूहळू एका मोठ्या फुग्यावर बसून तरंगत अलगद वरवर जायाला लागतो. सगळे फेसबुक गुलाबी दिसायला लागते. इथले सगळे आखाडे बंद होतात. शत्रूही प्रत्यक्ष आयुष्यात भली चांगली माणसं असावीत, असले रिकामचोट विचार मनात येऊन जातात. समोरच्याच्या पोस्टलाही मधेच जाऊन लव्ह मारण्याचे प्रकार चालू होतात. नगरच्या गंजबाजारात फिरणार्या वासाड्या पोरांनाही आपण मागे टाकतो आणि अचानक एक दिवस
आपल्या एका पोस्टवर बदामवाल्याची कमेंट येते,
असहमत. आणि एंग्री वाला कडक खंग्राट इमॉटिकॉन चमकून जातो. फुग्याला हलकी सुई मारल्यासारखी होते. आणि आपण वेगाने सॅंग सुईंग फटॅक्क करत खाली कोसळतो.
कधी कधी बदाम देणारा किंवा देणारी अचानक अकाऊंट डीअॅक्टिव्हेट करून आपल्यासमोर व्हॅक्यूम टाकून निघून जातात. कधी ते अचानक आपला फेक चेहरा काढून तुम्हांला वाटत असलेल्या औत्यूक्याच्या खून होईल असा आपला खडाजंगी भयावह खरा चेहरा डीपीला आणून तुम्हांला हादरा देतात. कधी तुमचे ज्यावर हळूहळू सीक्रेट लौ होऊ लागले आहे उग्गाच ते तुमच्याच जेंडरचे निघतात. किरण असं नाव असलं आणि डीपीला फूलं फळं लावलेलं असलं की कसे कळावेत की हा बाई आहे की पुरूष ते? तर कधी ते डायरेक्ट थेट आपल्या लग्नाच्या अॅनिव्हरसरीचाच फोटो टाकून देतात. आपल्याला हार्ट अटॅक.
लाईक लव्ह अॅंग्री वरून हल्ली असे बंध विणले जातात आणि तुटतात. कायच्या काय बाब्बा. फेसबुक वाईटच. सोडलं पाहिजे.

Comments

  1. तुम्ही फेसबुक सोडलं तर आम्हाला हे असल कान पकडून कोण सांगणार..

    कलम वाली यंग लेडी हो आप..

    ReplyDelete
  2. नेहमी असच होत , पण fb हे व्यसन आहे ना ?

    ReplyDelete
    Replies
    1. हो. काही तरी व्यसन हवंच ना पण.

      Delete
  3. hahaha!!! Cool! Really good one :)

    ReplyDelete

Post a Comment