आईशप्पत हे क्काय्ये.. seriously ?

हा अमुकच ते का लिहतो
ही लिहते ती स्वत:ला लेखिका समजते की कॉय आली मोठी शाणी
हे काय धड्या गांडीचं लिहतात?
हे पेपरमधे का लिहतात बोअरैत साले
हे फेसबुकवरच का लिहतात अशांत आहेत साले
लिहणारा डावा आहे की उजवा बेंच्यो ?
हा स्त्रीवादी आहे की पुरूषवादी?
हा मुळात वादी आहे की षंढ?
ह्यांनी आंबेडकर वाचलेत का
नेहरू वाचलेत का
गांधी वाचलेत का
शेक्सपिअर वाचलाय का..
हा मुका नाही पण आंधळा आहे बेंच्यो
ही सेक्सवर लिहते खूप
सेक्स लिहण्याचा नाही करण्याचा विषय आहे
#WTF #भिकारजोक्सलिहण्याचीसवयअसतेकाहींना
हा तर न बोलून सेक्सिटाय हरामी
बबन लिहतो म्हणून गांडू
छगन्यात लिहायची हिंमतच नाही म्हणून तो गांडू
किती शिव्या किती शिव्या किती शिव्या
हिच्या काय हळव्या फुळव्या प्रेम कविता
थ्थ.. हा चुत्या फक्त ब्रेकअपवर त लिहतो
तो आईवर.
मर्ढेकर, खांडेकर, पुलं, वपु, पुशि ह्यांची ग्रेस कुठे नी हे कुठे
हाड कुत्र्या !
अमकीच्या लिखाणात हळहळीची मळमळ
उसासे फ्फ फ्फ आह उंह.. हू हू
ढमक्याच्या लिखाणात राजकारणच बास
ह्याला त्याला दिलेली तळतळ
हा पेनाने लिहतो
हा पनाम्याच्या टोकाने
कुणी भोकात लपून लिहतो
कुणी कुणाला खुशाल भोकात घालून लिहतो
कुणी ठोकून लिहतो
हा हा नं.. हा खरा लेखक
गरीब, पायात घालायला चप्पल नाही, गर्लफ्रेंड मिळत नाही
दोन वेळचे खायचे वांदे झालेत.. हा खरा कलाकार.
हा झोकून लिहतो.
कुणी लिहताना स्वत: स्वत:ची ठोकतो
हा चाटूगिरी करतो
गरम तव्यावर पोळी शेकतो
.
.
चर्चा किती आणि कसली रे चर्चा
वाचायचं तर वाचा नाहीतर द्या सोडून आयच्या गावात..
येडझवे आहात का तुम्ही?



Comments

  1. Me comment keli tr shivya ghalin aikla me

    ReplyDelete

Post a Comment