मजा आली पाहिजे

काहीच न लिहता लिखाणावर बोलण्याचा हाच तो कीडा
..
मला अशी काही माणसं भेटली आहेत जी थोडं थोडं लिहून झालं की ते लिखाण दुसर्यांना दाखवून लिहलेलं चांगलं आहे की नाही हे कन्फर्म करून घेत असतात.. काय गरज? कश्यासाठी म्हणजे.. संपूर्ण पूर्ण लिहून झाल्यावर ते दाखवणं हे ठीक वाटतं. लिखाण सुरू असताना किंवा त्याचा जर्म डोस्क्यात असताना अगदी ज्याच्याशी आपल्या सटकलेल्या तारा जरा मिळतात आणि तो माणूस आपली तार पूर्ण दुरूस्त न करता फक्त तिथे शॉर्ट सर्कीट होणार नाही ह्याची काळजी घेईल, ह्याबाबत खात्री असते त्याशी थोडंफार विषयाबाबत बोलणं ओकेय. आपलं काम फेल तर होणार नाही ना ह्याची भीती घालवण्यासाठी जर चार लोकांकडून सतत कन्फर्मेशन लागणार असेल तर तसंही लोकांना काय आवडतं त्याबरहुकूम ते लिहणं असेल. हे फार वाह्यात वाटेल पण मला फरक पडत नाही. फोअरप्ले दरम्यान आपण समोरच्याला विचारत नाही एकेक मिनिटाला आवडतंय का ठीकेय का..  आपण फक्त तुटून पडत असतो समोरच्यावर. चावटपणा पुरे. हो. तर चार लोकांशी आपल्या आयडिया चर्चत चावत चाबडवत ठेवलं की सगळा ज्यूस निघून जातो. ऐसा नै करनेका मामू. आपण खूप स्वार्थी झालं पाहिजे असं नाही वाटत.. 
आपल्या डोक्यात आलेल्या कल्पनेने जोवर आपण एक्सायटेड असतो तोवर त्याशी रत होण्यात मजा आहे. लोकांना आवडेल की नाही.. Why Bother.. आपल्याला मजा येणं महत्वाचं आहे. लोकांना जे आधीपासून आवडत आलेलं आहे त्याची मोडतोड करणं आणि आपलं घोडं दामटवणं जोरदार ह्यातही ती आहे.. मजा.

 ..
वारली चित्रांचं एक छोटं वर्कशॉप केलं होतं. त्याचं एक पेंटिंग करून आणायला ऑमच्या टीचरनी मला सांगितलं. मी वारल्यांची पार्टी रंगवली आणि दाखवली. टीचर एकदम खूष झाल्या आणि मला कडकडून मिठी मारून म्हणाल्या आता मी सुद्धा हे असं करून पाहणार. मी लगेच म्हणाले.. न्नो. तुम्ही वेगळं काही तरी करा नाहीतर तुम्हांला झकास फीलिंग येणार नाही. पण त्यांनी काही केलं नाही. ते मी त्यांना खत्रुडसारखं टोचून बोलूनही दाखवलं.


Comments

  1. अगदी योग्य! अर्धवट शिजलेली खिचडी चव बघायला म्हणून सुद्धा देऊ नये कुणाला!

    ReplyDelete

Post a Comment