सरफिरे सेल्फिले

आपल्या बाळाचं पोषण व्हावं म्हणून त्याला चांगलं चुंगलं खायला करून घालणारी आणि आपण असं का करतो, ह्याबद्दल अधूनमधून बोलणारी आई ही सुद्धा कुठल्या तरी मानसिक आजाराची बळी असावी अशी दाट शंका मला यायला लागली आहे. कारण काय्ये की हल्ली कुणीही स्वत:ला काय आवडेल ते करत असेल तर ती माणसं आत्ममग्न, स्वत:च्या प्रेमात किंवा फ्रस्ट्रेटेड आहेत, असं म्हणण्याची एक साथ आली आहे आणि त्या साथीत फेसबुकवरची ढोरं पटापटा मरून पडत आहेत. 
अमका आनंद व्यक्त करतो किंवा राग व्यक्त करतो. अमका छान कपडे घालून त्याचे फोटो टाकतो. तो ती ते ते त्या ती प्रवासवर्णंन करतात साख्खीसाख्खी. तो काय वाचतो ह्याचे त्या माणसाने फोटो टाकणं ते शेअर करणं हे कुठल्यातरी फ्रस्ट्रेशनपोटी असतं, हे सांगणं तुम्ही एकदा तरी फेसबुकवर केलेलं नसेल तर तुम्ही इथले प्रो नव्हेत, असं कुणालाही वाटू नये या भीतीपोटी तर अशी शेरेबा करावीच लागते. आपण असं म्हणत नसू तर जे दुसर्याला फ्रस्ट्रेटेड म्हणतात त्यांच्यापुढे ढुंगणाला एक पीस लाऊन मोरडान्स करणं हे तरी करावं लागते. सेल्फी काढणार्यांचे तर हाल कुत्रं खात नाही. ते तर पहिले फ्रस्ट्रेशनचे बळी आहेत हे सांगणं य्य इझि असतं.
आता एखाद्याने सेल्फी काढले भले दिवसातून दहा.. तर तुमच्या बापाचे काय जाते हो.. आम्ही त्यांच्या मिश्या लावतो का आणि त्या पिळतो म्हणून तुम्हांला चिमटे बसातात कॉ? पण नाही असं नसतं. त्यातून सेल्फी काढणारी ललना किंवा लल्लू पाऊट काढणारे माना वाकडे करून फोटो काढत असतील तर खतम. जे होते त्याचे सतत निरीक्षण करून ज्यांचे भागत नाही तर त्यापलिकडे सतत निष्कर्षाप्रत येण्याची ज्यांना खाज असते त्यांचे फ्रस्ट्रेशन काय ल्याव्हलचे अशेल हे त्या फ्रस्ट्रेटेड जगन्नियंत्यास ठाऊक हो.

सेल्फी काढणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आम्हांला येडे म्हणता क्काय.. तुमच्या नानाची टांग.

Comments

  1. बरोबर आहे तुझे रेणू. जे चांगले आहे ते का दाखवायचे नाही? काश माझा चेहरा सेल्फी योग्य होता!😢😢

    ReplyDelete
    Replies
    1. घ्यायचा मोबाईल आणि करायचं क्लिक.आपणच बेस्ट दिसतो म्हणायचं हाय काय नी नाय काय.

      Delete

Post a Comment