मी सॉरी म्हणीन पण उठावं तुम्हांला लागेल

आज सीसीडीत गेले होते. गप्पा मारतो होतो. मागून हाक आली. एक दाढीवालं लेकरू बसलं होतं. क्विट स्मोकिंग, आय अॅम हॅविंग ट्रबल, तो म्हणाला. च्यायला हे तर क्विट इंडियासारखं झालं. टाळकच सटकलं माझं. प्रतिक्षिप्त क्रियेसारखं वाक्य बाहेर पडलं, यू हॅव ट्रबल गो इनसाईडड. मग एकदम गपचूप शिस्तीत.
त्या मुलासमोर बसलेल्या मुलीकडे त्याने तक्रार केली असावी, तिने जळजळीत खुन्नस फेकला. मी कसली ऐकायला, तू खुन्नस मी दहा खुन्नस साला. मग मलाच कसंतरी झालं. मला ब्रेथलेस होण्याचा त्रास आहे, श्वास न पुरणं त्यासाठी तडफड होणं काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे. मी पुन्हा त्याला हाक मारली आणि सांगितलं की, तुला त्रास होतो आहे तर मी दुसरीकडे जाऊन बसू शकते, पण माझी इथे बसण्याची नेहमीची जागाच काय बाकी सगळ्याच जागा भरलेल्या आहेत नाहीतर आनंदाने उठून गेले असते. तुला त्रास देण्याचा माझा हेतू नाही पण स्मोक करता यावं म्हणून मी इथे आलेली आहे, समजून घे. चुकून बोलले तुला फटकन, माफ कर. 

तो हसला पण आणि तिथेच बसून राहिला. म्हणजे आता मी काय क्रू पिऊ की न पिऊ. लोच्याच झाला होता.
मग ते दोघे दुसरीकडे जागा झाल्यावर तिथे बसायला गेले तेही अश्या ठिकाणी जिथे आधी बसलेल्या लोकांनी यज्ञ पेटवलेलाच होता. ह्या मुलाला जर स्मोकचा इतका त्रास होतो, तर त्याने सीसीडीच्या आत काचेने बंद केलेल्या नो स्मोकिंग झोनमधे बसायला विपुल जागा असताना तिथे बसणे हा पर्याय का निवडला नसावा?

तुमच्या आवडीनिवडी दुसर्यांवर का लादणार तुम्ही? शिवाजी पार्कला बाकी कुठे बसायलाच जागा नाही, अशीही स्थिती नसते. स्मोकिंग आरोग्याला हानिकारक आहे, असं सांगत हे लोकं हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करत फिरत असतात. उद्या एखादा स्मोकर अपघाताने मेला तरी हे म्हणणार, खूप ओढायचा म्हणून खपला.
कुणी सिगरेट ओढताना दिसलं की, स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ, असं पटकन म्हणून पटकन एक पायरी वर चढत सल्लागार, शुभचिंतकाच्या भूमिकेत शिरता येणं सोपं होतं. माणसाला बाकी हजार व्यवधानं असतात, त्यानेही माणूस त्याच्या ताणाखाली चेंगरून झेंजरत मरू शकतो. तुमचं ते एरव्हीचं काय दुखतं खुपतं ते बघायला न येणारे असे अच्चानक काळजीत येतात, कम्माल है भै.
वयाच्या ४४ व्या वर्षीही मी एखादी दुसरी सिगरेट प्यायला कुणाची परमिशन घ्यावी, आधी कधीच ती प्यायलेली नसताना.. सध्या परवडत असलेली सगळ्यात भारी लक्झुरी मी सोडून द्यावी असे पापी विचार ज्या कुणाच्या मनात येतात त्यांचे माझ्यावरचे प्रेम पाहून माझे अंत:करण पाणावले आणि डोळे हेलावलेत. देव तुमचं भलं करो.


Comments

  1. B.Sc ला होतो तेव्हा पासून ओढायचो. सी. आर. होतो. एक दिवस cigaret ओढली आणी नेमकं Hod सिंग मॅडम ने बोलवलं. भापकन वास आला असावा. भई तुम सिगरेट पिते हो. तो पर्यंत वास येत नाही अशी समजूत करून घEटाळी होती.
    पुढे मुक्त विद्यापीठात नोकरी लागली. Hod communication प्रकाश देशपांडे. पुन्हा वास आला. चव्हाण cigret पेक्क आह दारू पित
    जा रे!. आणि हे डेबोनेर आणि नेहरू दोन्ही वाचत जा.

    ReplyDelete
  2. पण सार्वजनिक ठिकाणी स्मोकीॆग करायला तशीही बंदीए ना कायद्याने. So don't you think he can tell you or anyone else to please stop smoking in public places?

    ReplyDelete

Post a Comment