हॉ हॉ हॉ

एकदा मिलिंद सोमण आमच्या महाराष्ट्र टाईम्सच्या ऑफीसात आला होता. तेव्हा नेमकी गर्दी कमी होती ऑफीसमध्ये. त्याला पाहून दिल दिमाग इतकं धाडधाड उडायला लागलं की हृदय तोंडातून बक्कन बाहेर पडून घरंगळत घरंगळत त्याच्यापाशी जाऊन पोहोचेल की कॉय ह्या भितीने मी एका क्युबिकलमधे जाऊन लपून बसले. त्यादिवशी मी हाताला मिळेल तो बकवास ड्रेस घालून गेलेली होते. नो इस्त्री नथिंग. मि.सो. येणाराय ह्याची मला ह्यांनी आधीच कल्पना दिली असती तर मी नवा ड्रेस घेऊन घालून नसते आल्ये ?.. बरं ते राहूंद्या. डोक्याला तेल लाऊन गेले होते तेssल. दॅट वॉझ माय बॅड हेअर डे. ऐसा मेरेही साथ क्यू होता है अण्णा? अण्णाही हसले हॉहॉहॉ. ज्या दिवशी सगळ्यात जास्त आवरून जाण्याची ग्रज होती तेव्हाच आम्ही आमच्या ईज्जतचा वडापाव करून घेतल्याने त्या प्रसंगाचा सामना तेलूस चेहर्याने कसा करावा, कसा? सुधरतच नव्हते.

पण आमचे सर श्री. प्रवीण टोकेकर ह्यांनी, मी केवळ चसका म्हणून एकदा चष्मा लाऊन ऑफीसमध्ये आले आहे, हे जसे अचूक ताडले होते आणि मग ते त्यांच्या खास स्टायलित जसे हॉहॉहॉ करून हसले होते.. त्याचप्रमाणे मी ऑतॉ पार आतआतल्या बिळात का लपून बसलेली आहे, हे ओळखून त्यांनी सोमणांच्या दिलजाळूक पोरासमोर माझ्या नावाचा हाकारा सुरू केला. रेणुका.. रेणुका.. इकडे ये.. ये गं.. लौकर लौकर ये म्हणे.
( भंबेरी उडणे म्हणजे काय.. प्लीज नको प्लीज नको प्लीज.. प्लीज.. )


ही रेणुका, हिला तुम्ही खूपच आवडता, अशी माझी एक लबाड ओळख करून देऊन टोकेकरांनी मला त्या मेड इन इंडिया, अमर्याद देखण्या, राजबिंड्या, सहन होत नाही आणि सांगता येत नाही इतक्या खतरनाक कत्तलबाज सेक्सी.. आफत - ऐ - हुस्नसमोर सळो की पळो करून सोडले. कंम्पीट चोक झाले मी राव !
तेव्हा तो जे काही हसला. मी शॉट डेड. ह्याच्यानंतर देखणेपणाच्या व्याखेची हद्द संपते. मग त्याने शेकहॅण्ड करायला हात पुढे केला. " आय अॅम मिलिंद ", अशी सेल्फ इंट्रडक्शन करून दिली. सॉलिड जोक. म्हंजे एवढंच राहीलं होतं.. ह्याला मी ओळखत नसेन?!!!
मी माझा हात कधी त्याच्या हातात दिला.. तो त्याने कधी हातात घेतला.. माझा हात माझ्यासकट कधी वितळला.. आणि मग तो कधी तिथून निघून गेला... मला कळलंच नाही इतकी मुग्धावस्था झाली होती माझी. इतकं हरखून जाण्यासारखं, पळापळ करण्यासारखं काय आहे, असं तडक विचारून माझा गेम करून मग टोकेकर सर पुन्हा हसले. हॉहॉहॉ.

( फोटो सौजन्य - गुगल )

Comments

  1. >> ह्याच्यानंतर देखणेपणाच्या व्याखेची हद्द संपते.
    So fucking true!
    'मुग्धावस्था' शब्द आवडला. :)

    ReplyDelete
  2. एखादा "तो" किती देखणा, सेक्सी वगैरे आहे हे खरे तर एखाद्या "ती" च्या नजरेतूनच असे प्रकटते!
    हां, एखाद्या मर्लिन, मधुबाला, रेखा, रेखो, वगैरें बाबत एखादा "तो" असे काही लिहु शकेल, बोलु शकेल.
    स्त्रिच्या नजरेतून पुरुषी देखणेपणाबद्दल इतक्या बिन्धास्त लिहील्याबद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  3. मी पण नेमकी अशा वेळी चुनचुनके बकवास टाॅप घालून गेल्याचं आठवलं...💞

    ReplyDelete
  4. हे अगोदर वाचले होते रेणुका आणि आज पुनःप्रत्ययाचा आनंद! आजच्या पोस्टमधले एक वाक्य खूप आवडले, आम्ही मोट्ठे झालो म्हणजे तू मोठा झाला असणारच. पण तू किती छान मोठा झालास! खूप हसलो! काय ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचं सगळेच आवडते बयो!Milind you don't even know how lucky you are!

    ReplyDelete
    Replies
    1. मेरिल स्ट्रीप ही एक आवडती अभिनेत्री. जिचा वयाशी काही संबंध नाही.

      Delete
  5. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच्या अाठौणी जाग्या झाल्या. परवाचीच गोष्ट.. त्याला पाहताना पुढ्यातली पायरी चुकली आणि मी त्याच्याच अंगावर पडण्यापासून वाचला होता तो. त्यानेच हात पुढे केला, आणि मी त्याला धरून सरळ उभी झाले. देवराई सिनेमाचा स्पेशल शो होता प्रभादेवीला.. अगदी परवाचीच गोष्ट.. ;) 💘

    ReplyDelete
  6. https://www.loksatta.com/manoranjan-news/milind-soman-new-selfie-with-girlfriend-ankita-konwar-doesnt-care-about-trolls-see-photos-1581782/

    ReplyDelete

Post a Comment