काली




बाबा जिथे रहात तिथे मस्त चाळीसारखं वातावरण होतचं. कुठे काय चाललेलं आहे सगळ्यांना कळत असे. शेजार्यांच्या शेजारी राठोड रहात व त्यांचा एक शेजार सोडून पुढच्या शेजारच्या घरात मनोजची आई रहात असे. मनोजचे बाबा तो लहान असतानाच वारले. राठोड काकांची बायडी तीन मुलांचा जन्म झाल्यावर वारली.
बातम्यांना तोंड फुटायला काय वेळ लागतोय.. राठोड काका आणि मनोजची आई हम हम हम हम.. मला राग यायचा तेव्हापासून अश्या गॉसिपचा. ज्याचं त्याचं सुख. पण मला गॉसिप ऐकायचीही असत. होहो म्हणजे काय.. गॉसिप ऐकण्यात आपण कुठे तरी आहोत म्हणजे आपल्यासमोर बोलायला समोरच्या माणसाला बिंधास्त वाटतं, हे सुखाचं असतं हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना असेलच. 🙄😜
माझे खेळून संपायचेच नाही कधी. म्हणजे कधीच. येकदा खेळता खेळता जोरात पडले आणि हनुवटी इतकी खरटली की बस्स. लागलं की आमचे सुपुत्र जशी बोंबाबोंब करतात तशी मी नव्हते. हनुवटीला खालून आडवी चीरच पडली होती. घरात आले तर बाबा नव्हते. जखम धुऊन मी त्याला बर्फ लावला. तरी ठूसठूसत होतं. दुखत होतं. कुणीच समोर नसल्याने रडूनही फायदा नव्हता. 🤓
अचानक खड्डॅक्क ठ्ठ असा आवाज आला. हा राठोडांच्या दरवाज्याची कढी काढल्याचा आवाज. मी माझ्या दरवाज्यापर्यंत आले. त्या दरवाज्याला माणसाच्या उंचीच्या हिशोबाने जमिनीपासून साधारण पाच फूट वर एक पत्र टाकण्यासाठी झडप उघड बंद करता येईल अशी अटॅचमेंट लावली होती. ती वाकवून पाहिली की बाहेरचेही दिसे म्हणजे कोण आलंय गेलंय सारं. मी हळूच ते उघडून पाहिलं तर राठोड काका त्या.. त्या... त्या घरात जात होते. जाताना इकडे तिकडे वळून आपल्याला कुणी बघत तर नाही नं हेही पहात होते. जवळपास अर्ध्या तासाने ते बाहेर आले. तोवर मी आमच्या घराच्या आत त्या झडपेला डोळा लाऊन उभी. पायाखाली त्या उंचीपर्यंत पोहोचता यावं म्हणून कणकेच्या पिठाचा डबा ठेवला होता. ते सारे होईपर्यंत मला जराही दुखले नाही की त्याची जर्रा म्हणून आठवण झाली नाही. मग सारे बघून हुश्श झाल्यावर मी शाण्या मुलीसारखी झोपले आणि संध्याकाळी मळे पिकवले.

बस इक सनम चाहिये आशिकीके लिये
ट्याड्याव ट्याडाव ट्याडाव ट्याडाव

त्या काकांचं नाव कालिदास होतं. आम्ही त्याला ' काली ' म्हणायचो.. आणि वर त्याच्या नातवालाही सांगायचो तेरे दादा का नाम क्या है? तो इतकं बारीक किनर्या आवाजात गालाला गोड खळी पाडून म्हणे.. ' खा.. ली ' क्या.. क्या जारसे बोल... ' खाल्ली'

Comments

  1. किती ओघवते लिहितेस। तुझे प्रतिबिंब सहज उमटते तुझया लेखनात. लेखनात लेखक दिसावा का? आपण त्याला तिला शोधावे का? हे प्रश्न असतातच. पण आठवणीत तो/ती दिसणे आणि इतके पारदर्शी दिसणे आठवण खूप सुंदर करते. आवडले!

    ReplyDelete

Post a Comment