माती दगड धोंडा

आपल्याला जे वाटतं ते तसंच समोरच्याला वाटलं पाहिजे असे दुराग्रह गळून पडायला वेळ लागतो. 
ती समज आल्यावर समोरच्याचं वाटणं हे त्याचं त्याला ठरवू दिलं पाहिजे, हे कळतं. तुम्हांला जशी वाटते तशी माणूस मी नाही, हे पटवून देण्यात काय मजा आहे.. शिवाय ते थकवणारंही असतं. आपण कसे आहोत हे तरी निश्चित कुठे कळलेलं असतं पक्कं आपणास.

धूप होऊन रंग पोत उंचसखलपणात बदलत राहणार्या नदीपात्रातल्या दगडगोट्यांसारखे असतो आपण. 
ढेकूळ विरघळून माती मोकळी होऊन वाहू लागल्यावर समजतं आपण तर स्वत:ला टणक दगड समजत होतो. 
क्वचित आसपासचे सारे विरघळून प्रवाहात वाहू लागल्यावर त्याचा एक भाग होणार ह्या आनंदात असताना पाण्याचा प्रवाह अडवणार्या आणि फिरवणार्या रूतून बसलेल्या मोठ्या धोंड्यासारखेही दिसायला लागतो.

Comments

  1. Very true.. An mag kuthalaach aagrah urat nh... Viraktach houn jayala hot

    ReplyDelete
  2. Very true.. An mag kuthalaach aagrah urat nh... Viraktach houn jayala hot

    ReplyDelete

Post a Comment