पुरष पटतात रे..

पुरूष पटकन किंवा पचकन हो म्हणाले की मज्जा येत नाही.. हा गेम आहे.. तो लांबला पाहिजे हे अनेक पुरषांना कळत नाही. क्वचित मुली टिचकी वाजवून हो की नाही बोल असं म्हणाली की त्यांची हवा टाईट होते. स्त्रियांनी अशी अस्त्र वापरून होकार मिळवणं हे फार्फार वाईट आहे. मी साम दाम दंड भेद ह्या प्रकारातल्या ह्या भेदाचा अनेकदा गैरवापर केला आहे. असो झाले ते झाले गतं न शोच्यम.
माझ्या एका मैत्रिणीला एक पुरूष चिकार आवडतो. पण थेट बोलायला भीती वाटते. तो नाही म्हणाला तर.. केळं. तो नाही म्हणाला तर म्हणून आपण आपुल्या मनिचे बोल न बोलून आपला केळ्याचा घड दुसरीच कुणी पळवून नेईल ह्याची वाट बघत बसायची का. येडचाप असतात काय पोरी.. झुरत बसताता याईक्स. नाही बोलला तर.. काही महिने वाईट वाटेल. पण कळ्या बहरतच असतात फुले फुलतच असतात.
शिवाय नाही म्हणाला तर परत तिथे त्या वाटेला फिरकायचंही नाही, ऐसा थोडी करनेका. २०० टक्के जोर लावायचा. खोटा खोटा इमोशनल द्यायचं. मुलं पटवताना कधीही मनापासून खरं रडायचं नाही. डोळ्यात जराजरा ओल आली की पुरषांच्या पायाखालची जमीन हलायला लागते, त्या ओलीने त्यांच्या हृदयाच्या दगडी अभेद्य भिंती तडकून भूईसपाट होतात. मग अनेक दिवस भेट टाळणे फोनवरही उपलब्ध न राहणे हे प्रयोग करायचे. माझ्या एका पीजी मैत्रिणीने हे सारे उपाय केले आणि तिला हो ना हो ना करणारा एक दिवस आमच्या इमारतीखाली दोनचार पेग घेऊन आला आणि त्याने फूल राडाच केला. त्याला तो विरह आणि तिचे पाठ फिरवून जाणे सहनच झाले नाही. त्या दिवसाचा आजही त्याला पस्तावा होतो आहे. 

पुरषांनी स्त्रीला पटवणे ह्यापेक्षा स्त्रीने पुरषाला पटवणे किंवा गटवणे, लाईन मारणे, त्या लायनीची जाडी कमी अधिक करत राहणे हा प्रकार कसला भारी आहे.. त्यातूनही तो पुरूष जाम मानत नसताना त्याचा होकार मिळवण्यात धमाल असते. पुरूष नकार देतात तेव्हा काय देखणे वाटायला लागतात अच्चानक.. साला झोपच लागत नाही. तुमच्यापैकी किती जणींना आहे कसा अनुभव?


Comments

  1. हे असलं खरंच कुणी केले तर जाम मसाला येईल जीवनात ���� आणि हो हा तुम्ही टाकलेल्या फोटोत मिशी भालचंद्र नेमांड्यासारखी दिसतेय �� लिखाण आवडतं तुमचं. ��

    ReplyDelete

Post a Comment