डन है जी

चंग्या - वो जब याद आये.. बहोत याद आये... दमे जिंदगी के अंधेरे मे हमने.. चरागे मुहोब्बत जलाये बुझाये
बेबी - ए ए एक मिनिट दमे जिंदगी नाही साहेब... गमे गमे जिंदगी के आहे ते.. तुम्हां फुकाड्या लोकांना जिथे तिथे दम'च आठवतो आणि पुढे, चरागे मुहोब्बत जलाये बुझाये म्हणजे; क्या बात है ही तर चक्क लायटरची आठवण. काय रोमांस आहे हा ह्या ह्या ह्या 
चंग्या - नाही गं सिगरेट संपल्यात पण त्याच्या आठवणीत नाही म्हणतोय. माझं आवडतं गाणं आहे हे पारसमणीमधलं.
बेबी - त्यातल्या महिपालची मिशी कसली दिसते... लहान मुलांने बारीक रेष ओढून ठेवल्यासारखी. कसे होते तेव्हाचे हिरो.. आणि त्या गाण्यातली ती पुरीसारखी गोल गोल फुगलेली चब्बी चिक्सवाली हिरोईन, त्यांचे मेलोड्रामाटिक एक्सप्रेशन्स कसलेऐत.
चंग्या - गीतांजली वाटतं.
बेबी - ए मला ना पायाला खूप डास चावताएत. ऊत आलाय डुकरांना. लाईट लाव आणि रॅकेट घे बरं जरा.
चंग्या - हे असं असतं. किंमतच नाही. मी गाणं म्हणतोय आणि बायको मला डास मारायला सांगतेय.
बेबी - डास मारून म्हण की गाणं कंटिन्यू. माझे बाबा हेच गाणं कितिंदा म्हणायचे रे. लहान असताना मला झोपवताना अशीच जुनी गाणी म्हणत बाबा. उगाच माझे पाय चेपत पायाला तेल लाऊन वाटीने घासत बसायचे. एक हे गाणं आणि चौदहवी का चांद हो, याद ना जाये बिते दिनों की जाके ना आये वो पल.. हे फिक्स. रात्रीच्या अंधारात हलक्या झोपेत बाबांच्या आवाजातली ती जुनी गाणी हळूहळू पाठ व्हायला लागली माझी. त्यांना आईची आठवण येत असायची वाटतं. कधीकधी गाताना त्यांना भरून यायचं आणि ते रडायला लागायचे. त्यांना वाटे मला झोप लागली की काय. रडायचे पुन्हा गायला लागायचे. ते म्हणायचे त्यातली बरीचशी गाणी तुला पाठ आहेत ह्याचं मला आश्चर्यही वाटतं. मला खूप छान वाटतं हे कनेक्शन. तू गा यार.. आय लव यू.
चंग्या - थांब बाई. आधी डास मारतो मग तुला जवळ घेतो आणि गाणं म्हणतो. चालेल.
बेबी - डन है जी.



फोटो - गुगलवरून

Comments

  1. वो जब याद आये बहोत याद आये...गम-ए-जिंदगी ...खूप खूप छान आहे हे गाणं... पूर्वीची काही गाणी ऑडिओ क्लिप वरुन च ऐकावी..👍👍👍👌💐

    ReplyDelete

Post a Comment