ए वासाडे..

आपल्या आवडीच्या माणसांना नाव न घेता संबोधण्यासाठी किंवा एखाद्याबद्दल कुटाळक्या करताना वापरण्यात येणार्या काही खास शब्दांची मला फार सवय आहे. सहज लिहून काढले. ही शब्दसंपदा वाढायला हवी असं राहून राहून वाटतं. माझा एक मामेभाऊ मला लहानपणी पाणी आण असं न सांगता, ए काळे पाणी आण असं म्हणे. फार प्रेम होतं त्या 'काळे' शब्दांत. पण हे तो म्हणाला तर ठीक आणि कुणी बोललं तर मी सोलून काढत असे.
थोबाडे, कुत्रे, डुकरे, काळे, टवळे, मुडदे, डुचके, ढुसने, ढुसके, भुतने, थोबाडतोंडे, मुस्काडतोंडे, मुस्काडे, हाडके, पादरे, पावटे, भुताळे, भूतने, युवळे, माकडतोंडे, आंबटढमाले ( आंबटशौक करणारी, पोर्न पाहणारी, पोरं फिरवणारी, वास मारणारी, लाईन मारणारी, एकसाथ सगळ्यांनाच पटवण्याची ताकद राखून असलेलेली ), चपटे, टोंगाळे ( ह्याचं पुढे अजून एक रूप टोंगाळीच्या टोंगाळी म्हणजे लंबूटांग किंवा ढब्बूढोल ) हे शब्द कोण कुणास म्हणाले ह्यावर त्याची ब्युवटी अवलंबून आहे क्काय ! तुमचं समोरच्यावर किती प्रेम आहे, समोरचा कसा आहे.. तो असे राजस शाब्दिक पिंक तोंडी लाऊन आत घोळवू शकतो का ह्यावर त्यांचे आदानप्रदान अवलंबून असते. जसे की
मी - काय गं टवळे, डुकरे, कुठे गाव घेत फिरत होतीस..
समोरची -   एय वासाडे, काल तू जाऊन आली. आज मी फिरले तर तुझ्या बुडाखाली का जळतंय टुक्कार कुत्रे ?
असा तो प्रेमालाप असतो. ' यिवळी ' हा शब्द फार सुंदर आहे फारच. सतत व्हिवळणारा, रडणारा, जिंदगीसे खफा, रूठा रूठा असा माणूस यिवळा किंवा यिवळी असते. जास्त नटणारी मुरडणारी ती नटोरीबाई. सतत शेजार्यांकडून साखर मीठ अर्धा कांदा अर्धा टॉमॅटो वाटीतून मागणार्या त्या 'कटोरीवाल्या बाई'. जास्त बडबडणारी ( ह्याच्या त्याच्या तोंडाला लागणारी ती तोंडरी. म्हणजे लागो बाबा आनंद आहे, पण गॉसिपताना एक शब्द लागतो म्हणून हा शब्द.) भिंगबहिरी म्हणजे माठ जिला डोळ्याला ढापण आहे ऐकायला कान आहेत पण त म्हणता ताकभात समजत नाही अशी ' रद्दाड, भंगार ' पोरगी. आता 'पादरे' ह्या शब्दाचा वापर आणि त्याचा शब्दश: अर्थ जो निघतो त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही. उगाच मधेच येऊन बोलणारे, काड्या करणारे, कळ लावणारे म्हणजे ढुसकुल्या सोडून प्रदूषण करणारे, भांडणं लावणारे, चहाड्या करणारे पादरे बोचे याअर्थी हा शब्द वापरला जातो. 

आपापसात बोलताना अश्या शब्दांचा समोरच्यावर तेवढा हक्क असेल आणि असे शब्द चपखल वापरण्याची औकात असेल तर मनमुराद वापरावेत. असं करताना कुणी दुखावलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी आणि खुशाल थोबाडतोंडेपणा करावा. डुक्कर हा माझा अतिशय लाडका शब्द आहे. तो मी कुणालाही वापरत नाही. खास गिन्याचुन्या लोकांसाठी तो आहे. वासाडे म्हणजे वासु मुलगी.  इतकेच माहीत्येत मला. 


हा आठवी ड वर्गातला मुलगाा वाटतो. ह्याहून अधिक समर्पक शब्द आपल्याला सुचत असल्यास जरूर कळवा. 


Comments

  1. वासाडे, लौ यू!

    ReplyDelete
    Replies
    1. अहाहा किती छान वाटलं कानाला. परत योग्य शब्दाची निवड केल्याबद्दल असं आतूsssन बरं वाटलं म्ला.

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete

Post a Comment