डास

माझ्या हातावर माझ्याच रक्तात
लडबडून पडलेला डास
हलकाफुलका असतो
मी केलेल्या हजारो डासांच्या खूनाचं ओझं
मनावर येत नाही
माझ्या हातापायाला चेहर्याला गालाला
येणारी करकर करकर खाज थांबण्यासाठी
डासाला ठेचकावण्यावाचून इलाज नसतो

मीपणातून मीही चावतच असेन नाही?
ह्याला त्याला.. हं ?
ते, निरूत्तराने किंवा दुरूत्तराने
माझ्या भावनांची कत्तल करून
एक क्षणिक समाधान फटक्यात मिळवतात
हांग आश्शी.
मग माझ्या डोळ्यातून रक्त येतं
जे मी त्यांनाच शोषून मिळवलेलं असतं कदाचित

दुखावणारे
अगतिक असल्याचं म्लान चेहर्याने वठवतात
त्यांचे डोळे बघा कसे चमकतात
माझं मन मारल्याचं
त्यांना ओझं वाटत नाही
नो गिल्ट.
त्यांच्यासाठी मी डास असेन.

Comments

  1. नाना पाटेकर यांच्या प्रसिद्ध डायलॉग ची आठवण झाली 👍👍👍👌💐

    ReplyDelete
  2. आता इथं लाईक किंवा reaction करता येत नाही पोस्ट ला त्यामुळं कंमेंटच करावी लागते. कसलं भारी लिहीलंय.

    ReplyDelete

Post a Comment