पलंगगप्पा - काय तू व्हर्जिन आहेस?

चंग्याचे आईबाबा आपल्या आईबाबांशी बाहेर गप्पांमधे रममाण झाल्याचं पाहून बेबी हळूच चंग्याच्या खोलीत शिरली आणि आतून कडी लाऊन तिने चंग्याला गपकन मिठीत घेतलं. तसं त्याच्या ओठाला कोरड पडली.. त्याला घाम फुटला.
चंग्या - अहो हो हो हो.. लग्नं व्हायचंय अजून आपलं..
बेबी - मग लग्नं करू की नंतर कोन नाय म्हनतं.
चंग्या - हो पण आपन अत्ता अंतर राखलं पाहिज्ये..
बेबी - एय.. बावळटे का रे तू. बालवाडीते का?
चंग्या - तुमच्याकडे बघून असं वाटलं नव्हतं. सोडा मला आई येईल माझी. आतल्या रूममधे...
बेबी - आतल्या रूममधे तिथे काये.. तिथे जाऊया का. ओके चल..
चंग्या - नाही नाही. मी माझ्या ह्या रूमला क्वचित आतून कडी लावतो. तुम्हांला आणि मला एकत्र इथे पाहिलं तर काय विचार करतील आईपप्पा.
बेबी - तू तुझ्या रूमची आतून कडीपण लावत नाही? म्हणजे काही सीक्रेट सामान इथून तिथे हलवायला पण नाही लावत कडी..
चंग्या - नाही असं काही माझं सीक्रेट काही नाहीच पालकांपासून..
बेबी - हे बघ मी काय व्हर्जिन नाहीये हां. तीन अफेअर होती माझी. त्यातले दोन मॅरीड एक अनमॅरीड होते.
चंग्या - ................. बापरे खरं की काय?
बेबी - मी माझ्या आईबाबांना घरी जाऊन फटके मारणारे. तरी बरं मी तुझी थोडी चौकशी आधी करू ठेवली होती. तुझं थेट लग्णच नॉ.. आधी काही चुम्माचाटी काहीच नाही? तुझं प्रगतीपुस्तक एकदम कोरंय कळलं मला..
चंग्या - हो. मी कधी कुठल्या मुलीला बोट पण नाही लावलं.
बेबी - किस केलं कधी..
चंग्या - एकदोनदा प्रयत्न केला होता मुलींशी बोलायचा.. ओओ तिथे हात नका लाऊ.. ओ सोडा काय करताय..
बेबी - ए भाऊ.. तुझे लईच वांदे आहेत रे. तुझ्या हिताची गोष्ट सांगते. माझ्याकडून तर आता टाटाबायबाय. पण यापुढे कुणा मुलीला भेटशील तर तू व्हर्जिन आहेस हे कुणाला सांगू नकोस. इट डझन्ट अॅड व्हॅल्यू टू युवर पोर्टफोलियो.. आयुष्यभर मग हात हलवत रहावं लागेल. एक्सपिरीयन्स जरूरी है. पहिल्या रात्री लाजायचं माझं स्वप्नं आहे.. तेव्हा तुझी शिकवणी घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. आणि हो एक किस दिला असतास तर काय मेला असतास काय बुचण्या..
चंग्या - ऑ.. 

Comments

Post a Comment