शॉक लगा लगा शॉक लगा.. भागो..

 कबीर लेगो खेळ असताना..
ए.. ढम्या तू काय करतो ?
अरे थांब रे.. मी काम करतोय दिसतं नाहीये का?
भाषा कबीर भाषा.. ( आम्हीही त्याच्याशी कधीकधी असं पटकन बोलून जातो आणि तेच पोट्टा लगेच उचलतो तर  आम्ही मारे त्याला भाषा बघ वगैरे सांगतो. पालक फारच दांभिक असतात राव. )
अरे हो रे.. कामच करतोय आही
तुमच्या वर्गात सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं..
सगलेच. सगलेच खूप मस्ती करता आही.. मॉनिटरसुद्धा खूप मस्ती करतो. टीचर सुट्टी घेऊन गेली जरावेला की सगळे मस्ती करता..
( 😂😂 वाह काय नजारा असेल तो.. )
कबीर तुला खोकला झालेला आहे. शाळेत चाकलेटं नी फाकलेटं काय खात नाहीस नं..?
आही आज रॉयडेनचा बड्डे होता नं मग त्याने सांगलं की इट द चॉकलेट. इफ यू डोन्ट इट टीचर विल बीट यू.
ओहSSS असं सांगितलं रॉयडेनने.. 😀😀 पण मला तर व्हॉटस अप ग्रूपवर कळलं की मान्विकचा बर्थ डे होता.
हो आही मान्विकचा पन होता नं.
मग तुला रॉयडेन आणि मान्विक.. दोन चॉकलेट मिळाले असतील ना.
नो. रॉंंग. फोर चॉकलेटस मिलाले. पन मी त्यातले टू च खाल्ले. मी घरी येताना बसमधे बसला होता ना तर फर्स्ट सी मधला एक खूप मोठा फॅट बॉय माझ्या मांडीवर येऊन बसला आणि म्हणाला, तू मला दोन चॉकलेट दिले नाही तर मी उठणारच नाही. त्याला दोन चॉकलेट दिले आणि मग तो गेला.
तू त्याला कश्यासाठी दिलेस चॉकलेट.. द्यायची की एक फाईट ठेऊन.. तू घरी आल्यावर मला मिळाली असती ती दोन चॉकलेटस... 😇😇
अरे कसं फाईट देऊ त्याला... आही तो खूप फॅट आहे. तो माझ्या मांडीवर बसूनच राहिला असता तर मी खूप घुसमटवला असता.
घुसमटलो असतो असं म्हण.
हो घुसमटवला असता.
तू बसमधल्या मंजू आंटीला का नाही सांगितलंस?
मंजू आंटी मलाच ओरडते.
का ?
तो फॅट बॉय माझ्यावर पाणी पण टाकतो आही.. बसअधे कधीकधी. आही.. लास्ट मंडेला माझ्याकडे वॉटरबॉटल नव्हती होती. ती मी शालेअधे हरवलेली होती तर माझ्याकडे फॅट बॉयवर टाकायला पाणी नव्हतं. तर मी त्याच्यावर थुंकला. तर मंजू आंटी मलाच ओरडली. 

क्काय..
😱😱😱😱😨😨


Comments