नग्नता

संस्कारांच्या कुजकट विळख्यात बंदिस्त झालेल्या भावना एक दिवस संपूर्ण कपडे उतरवून केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत एखाद्या समोर स्वेच्छेने, लालसेने नग्न होतात. कुण्या हेकट अडाणी समाजातील बुरशी आलेले संस्कार आंधळेपणाने लादणार्या आईबापाची आपण औलाद आहोत ह्यावर खदाखदा हसायचा उन्माद निसर्ग त्यावेळी देतो. ती निर्लज्जता त्या क्षणी उत्सवासम बनून गेली होती, हे रहस्य आपल्यापाशी ह्यापुढे कायम असणार आहे ह्याचा माज का वाटत असतो ? निसर्ग कायमच जिंकत आलेला आहे म्हणूनच असेल. मग मोडून पडणारे नियम व संस्कार बनवण्यात... त्याची वांझ बिजं रूजवण्यात आपण इतका सारा वेळ का बरं वाया का घालवत असतो ? अश्याने निसर्ग वाया जातो ना..





Comments

  1. अनेकांना ही बंधन नकोशी होतात.. पण समाजभयास्तव शेवटपर्यंत पाळावी लागतात.. जगभरात न्यूडिस्ट ग्रुप्स आहेत, समुद्रकिनारे किंवा काही क्लब्स आहेत.माझ्यासारख्याला तिथे कधी जाता येईल की नाही माहित नाही.. पण एक गोष्ट नक्की, इतरांसमोर नग्न होण्याची इच्छा अनावर होणे ही विकृती नक्कीच नसावी आणि प्रत्येक वेळी ती संभोग करण्याची इच्छा असते असाही ही नाही.. कधी कधी स्वतःला नैसर्गिक स्वरुपात एखादी समोर समर्पित करण्याची इच्छा होते

    ReplyDelete

Post a Comment