झूठ बोले कौवा काटे


...आही
( फूस वस्कून ) क्काय्ये??
आही मी तुझ्या पोटात होतो नं तेव्हा तू चिकन लॉलिपॉप फूल गिळायची होती का?
नाही रे बाळा मी किनई ते लाहोरी चिकन लॉलिपॉप चांगलं चावून चावून खायचे मग ते तुला पाईपमधून मिळायचं. तू मला पोटातून सिग्नल द्यायचास की, अजून पाहिजे अजून पाहिजे. मग मी रोज रोज ग्रेट पंजाब जाऊन लाहोरी चिकन खायचे. यमी मी खूप खूप खाल्ले आहेत मी ते क्या दिन थे वोह.. स्लर्रप्प्प्प्प
आही पण तो फूड पाईप छोटा असतो. असं कसं होऊ शकतं? म्हणजे तू मला फसवत होती आही. हो आही. तू एकटीच खायची होती तेव्हा चिकन लॉलिपॉप. मी बेबी होतो म्हणून तू मला फसवायची होती आही. मला उपाश्शीच ठेवायची होती तू.

Comments