प्रेम ये बहोत डुक्कर चीझ होती है

आकर्षणाची झिनत अमान मनात पैदा झालेली असताना
समोरच्यानं सावध करत बघ हं,
ही नक्की झिनत की जया भादुरी..
असं विचारलं की कोसळतो रे आपण
जगभरातल्या कावेबाज लोकांनी ' प्रेम '
या शब्दावर पाचेकशे कोटी कविता करून
या प्रेमवेचा अॅमवे करून टाकलेला आहे आइशप्पत !
सालं कुणावर खराखुरा जीव यावा तर हे
नतद्रष्ट.. निर्दयी.. पितळी नळाचे लगेच
आपल्या फिलिंग्ज पोस्टमॉर्टेमला घेतात..

Comments