मासे

बाई गं रड
रड माते रड
ठो ठो ठो रड
विद्रूप दिसण्याच्या भितीने
न रडता आतून कोरडं पडत जात
तडे जाऊन फुटून गेलेल्या माणसांसमोर
आक्रसण्याची काही गरज नाही |

नाकातून शेंबूड येईपर्यंत रड
तो पातळ होऊन
घशात उत्रून उष्टा होईपर्यंत रड
तुझ्या डोळ्यांमधून
अश्रू आले नाहीत
तर
पाण्याशिवाय दोन मासे
तडफडून मरून जातील |

Comments