कॉपी पेस्ट चा भस्म्या लागलाय का लोकांना

ह्या व्हॉटस अपने वाट लागलीये सगळी XXत. लिखाण ब्लॉगवर नेते आहे. तर तिथूनही लेख कॉपी पेस्ट करून ते व्हॉटस अपवर टाकले आहेत, असा मेसेज लोकं करतात तेव्हा सॉलिड सटकतं. काय गुन्हा केलाय आम्ही लिहणार्यांनी तुमचा.. ही काय खाज आहे विचित्र.. चांगलं लिखाण शेअर करावं वाटलं म्हणून.. छे अजिबात असं नाहीये. असं अजिबात्तच नाहीये.
ब्लॉगवरती ह्याबाबत सूचना स्पष्ट लिहलेली आहे. परवानगीशिवाय लिखाण घ्यायचं नाही म्हणून. इतका वेळ घालून लिहतो किंवा ते रीतसर एखाद्या ब्लॉगवर आणतो त्यामागे काही उद्देश असतो की नाही..? लोकं स्पेशली आपलं काही येऊन ब्लॉगवर आपल्या वॉलवर वाचतात ही किती सुखावणारी भावना असते.. ती तुम्ही अशी नासवून टाकणार का.. किती वेळ लागतो लिहायला.. ते सारं कॉपी पेस्ट करून व्हॉटस अप करायला काही सेकंद लागत असतील नं.. XXत तुम्ही रोमॅंस पण असाच का करत नाही व्हॉटस अपवर. तिथूनच मुलही होतील तुम्हांला.
लिखाण वाचायला त्या त्या ब्लॉगवरच जायचं किंवा ते ते पुस्तकच उघडून वाचायचं अशी तळमळ का वाटत नाही???? मी माझंच लिखाण उद्या व्हॉटस अप फॉरवर्डसाठी म्हणून विकते.. घेणार का कुणी विकत ते.. तेव्हा ढुंगणाला पाय लाऊन सगळे पळत सुटतील हे सारे फॉरवर्डमास्तर.
कुणाचं लिखाण विनापरवानगी व्हॉटस अपला फॉरवर्ड करून किंवा त्यात फेरफार करून चामटेगिरी करत आपल्या लिखाणात घुसडवून खपवणार्या लहानथोर निरागस विद्वानांना असा किंकी सेक्स केल्याने नक्की कोणत्या प्रकारचा ऑरगॅझम येत असेल.. ? मरो 

Comments