भोकाड पसरण्याची युक्ती

एक लहान मूल दगड दगड खेळत होतं. तो दगड माझ्या मुलाला लागला. मी त्याला शोधशोध शोधलं तर तो शक्य त्या सगळ्या ठिकाणी लपत होता. मग सगळी लहान मुलं आणि अर्थातच माझा मुलगा त्याच्या मागे लागले.. '' ये इधर छुपा है '' पासून ते ''आंटी आंटी ये ना ये इधर गाडी के पिछे लपा है..'' पर्यंत सारा ओरडोआरडा राडा झाला. ते भेदरलेलं गोडू थोडं हिरमुसलेलं होतंच आधी. मी त्याला खप्पकन पकडलं आणि कडेवर घेतलं.
.
.
काय रे असा दगड मारतात ?
मी वॉलवलती दगल मालत होता. कबील मधे आला..
पण तरीही असा दगड मारतात.. का ?
मी वॉलवलती दगल मालत होता कबील मधे आला..
( डोळे मोठे करून घसा खाकरून जरा आवाज चढवून )
म्हणूनच लांबून दगड फेकून मारायचे नसतात कळलं.. 👿
.
.
.
हे ऐकल्याबरोब्बर 😲😲😲
त्या बाळाने फूल स्पीडमधे डोळ्यातून पाण्याची उंच उंच कारंजी चालू करून अवकाशात असलेल्या एखाद्या अंतराळवीराला ऐकू जाईल इतकं आर्त ऑडीबल मम्म्माSSSS मम्माSSSS करत स्पष्ट खणखणीत भोकाड पसरलं. 😭😭😭😭😭😭😭😭...  😱😱😱😱😱 त्याने माझी पाचावर धारण बसून धरणी दुभंगून मला आत घेईल की काय असं वाटून, मी घाबरून त्याला खाली टाकून दिलं आणि माझ्या मुलाची गचांडी पकडून घरी धूम ठोकली. हे असं करायचं मी कबीरला पण शिकवून ठेवलं पाहिजे रे.. 😜😜

Comments

  1. मी पण असंच करायचो .. मार कमी बसायचा

    ReplyDelete

Post a Comment