डास.. डास.. डास..

काय माजलेत साले डास हल्ल.. हाताचं किस घेतो म्हणे. अरे किस घेता घेता पार स्मूच घेऊन टाकतात राव. मस्त फुगलेल्या जाड्या डासांना रॅकेटने मारताना जाम आनंद होतो.. माझं रक्त पितोस काय भिक्कारचोटा थांब तुझा मुडदा पाडिते.. रोज रात्री किमान पंधरा मिनिटं मी प्रचंड डास मारते. अख्या महाराष्ट्रात माझ्याइतकं वेगाने
दहा बाय दहाच्या खोलीतले डास रॅकेटने कुणीही मारू शकत नाही. 
 ह्या डासाचं म्हणजे त्या पियुश मिश्रांच्या एका कवितेतल्या कडव्यासारखं आहे..
वो काम भला क्या काम हुवा जिसकी न शक्ल ईबादत हो
और वो ईश्क भला क्या ईश्क हुवा जिसकी दरकार इजाज़त हो..
हा शेर सांगून मिश्रा तो पुढे खूप छान पद्धतीने समजावून सांगतात..  '' हम तो किस करेंगे भई.. परमिशन क्यो ले साला..'' हे असच काहीसं ह्या डासांचं आहे.. बरं आपण जा कलमुए असं म्हणून हात उडवून लावला तरी हे डासतात्या हातावर आपली सोंड खूपसून अमृततुल्य रक्त घोट घोट पीत असतात. चुंबनवीर मजा यायला लागल्यावर चुंबनआस्वादात आकंठ बुडालेले असताना जसे  डोळे मिटून घेतात आणि आरामसे त्यांचा प्रोग्रॅम चाललेला असतो.. अगदी तसच असतं बा ह्या डासांच.

Comments

  1. तुला साष्टांग दंडवत 👌💐

    ReplyDelete

Post a Comment