सेक्स म्हणजे नक्की काय ?

बोलणं... टीव्ही, फोन अख्खं जग स्वीच ऑफ करून जेव्हा कुणी फक्त आपल्यासाठी देत वेळ तेव्हा घड्याळ खूप जास्त स्पीडने पळतं. वेळ आहे की वाळू कळतंच नाही. माणूस पुरत नाही. कुणी हातात हात घेऊन बसणं.. डोळ्यात डोळे घालून बघणं, हलकं हलकं हसणं, हळूवार बोलणं..गप्प गप्प राहूनही सोबत चाखणं, गाणं, हसणं.. एखादं दुसरं डीप किंवा हलकं किस.. बस.. हेच सेक्स आहे. शरीराने होणारं सेक्स डोक्यावेगळं करता येतं. पण जिथे मनं जुळतात. तिथे शांतता असते. शरीर वेगाने जवळ येतं. पण ती धग कायम कशी टिकेल.. ती बदलेल पण ती जशी कशी असावी.. शरीर परत परत घुसावं भिडावं म्हणून जे होणं आवश्यक असतं त्याने ठरतं माणूस किती वाइल्ड आहे ते. सेक्स म्हणजे नक्की काय, कुणाशी करायला आवडेल असं मला विचारलं होतं एकदा कुणीतरी. ज्याचं नाव घेतल्यावर पोटातल्या पाण्याचं भांडं डचमळतं त्याच्याशीच करावं सेक्स...
पोटातल्या पाण्याचं भांड डचमळणं प्रकार हे मी लिहलंय की आणि कुणी आठवत नाही हा.. उगा रेफरन्स देऊन पावडर करू नका साला.. 
Photo - From google

Comments

  1. तू ग्रेट आहेस

    ReplyDelete
  2. तुम्ही जे काही बिनधास्त लिहता ते बरयाच लोकांन च मत असते, जे ते ओपेनलि बोलू शकत नाहीत पण तुम्ही सगळ्यांना फाट्यावर मारून जे लिहता त्याला तोड़ नाही रेखों :)

    ReplyDelete
  3. ज्याचं नाव घेतल्यावर पोटातल्या पाण्याचं भांडं डचमळतं त्याच्याशी सेक्स करणं यापेक्षा सुंदर आयुष्यात दुसरा काही असूच शकत नाही

    ReplyDelete
  4. अगदी मनातले लिहिले आहे गं...अनेकदा कळत नाही ते हेच... लव्यु रेणुका... पाण्याचं भांडे ...✌️

    ReplyDelete
  5. डॉ संजय कुऱ्हे21 January 2018 at 03:24

    खुप सुंदर ! ��

    ReplyDelete
  6. मी आतापर्यंत वाचलेल्या नितांत सुंदर गोष्टींपैकी एक आहे हे. स्वच्छ, निर्मळ पाण्यात पाय घालून बसल्यावर त्याचा तळ दिसावा ना तसं वाटलं. तू मनाने फार सुंदर आहेस रेखो. लव्ह यू <3

    ReplyDelete
  7. Khup mast aahet sarv titles & contents.... keep it up.

    ReplyDelete

Post a Comment