हडळवेळ

पोर्न फिल्म पाहून पाहून कंटाळा येतो मग मग. कारण ते सारं फार यांत्रिक, डीरेक्टेड असतं. रोज तीच ती दाबादाबी, ते आर्टिफिशियल अचंबूइक घश्यातलं कण्हणं, आखीवरेखीव मोठाल्या टणटणीत छात्या, घोटीव मांड्या, दटकट कुले, टॅटूड दंड, वेगवान हालचाली, ब्लो जॉब्ज... प्रत्येक क्लिपमधे ठासून भरलेलं. कधी कपलमधलं इरॉटिक सेक्स तर कधी गॅंगबॅंग कधी काळ्यावर पांढरी कधी पांढरीवर तीन काळे.
हे प्रकार अदलूनबदलून पाहिले की जरावेळ मनात घर्षणं होणार पण... उद्दीपित होणार्या मनाची भूक याहून मोठी असल्याचं लक्षात यायला लागतं आणि मग समोर हालणार्या कमनिय देहांकडे पाहूनही शरीरातून कोणताही स्त्राव स्रवणं बंद होतं. मॉडेल्सच्या कोणत्याही पोझिशनकडे पाहून मनाच्या कुपोषित कप्प्याची झीज भरून येतेय का, असं विचारतो आपण स्वत:ला. पण एका मास्ट्रबेशनला हॅंडल देण्यापुढे त्या पोर्नचं आयुष्यात काही कर्म नसतं. तिथे शरम नसते शृंगार नसतो. फकाफकी FUCKत.
खर्या भूकेची जाणीव होते. ही भूक नक्की काय आहे? कुणी फक्त हातात हात घेऊन बसणं, हलकं मिठीत घेणं, अकारण फोन करणं, एकमेकांसोबत असण्यासाठी फसणारे का होईना पण प्लॅन करणं..' बसस्टॉपवर ये ', इतकंंच लिहलेलं एक प्रेमपत्रं.
हे शोधत असतो आपण. ते मिळत नाही म्हणून घुसमटतो आपण. शरीराच्याआधी कुणाचं तरी मन हवंय आपल्याला ह्या जाणीवेने संध्याकाळ खायला उठते आणि रात्र हडळ बनून मानगुटीवर बसते. तारे जळत राहतात एका साकळलेल्या बर्फामधे. कोरडेपणा जळत राहतो घशात उतरलेल्या स्कॉचच्या प्रत्येक घोटासरशी. भूक विझत नाही. मन भरत नाही. गिळत राहते हडळवेळ..



Comments

  1. जबरदस्त. ह्या इतक्या पारदर्शक जाणीवा जशाच्या तशा उतरवल्याबद्दल सलाम तुम्हाला.

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिलं आहे,अगदी समोर उभ राहील ते सगळं, आता समजतं की खर तर त्यात तथ्य नव्हतं..

    ReplyDelete
  3. खूप छान, स्पष्ट रोखठोक ������

    ReplyDelete

Post a Comment