उलटी

दारू, सिगरेट, नकार, दगे, भांडणं, तिरस्कार,
मत्सर, उपासमार, गरीबी, आजारपण, मृत्यू,
समोर झालेल्या आत्महत्या, हत्या, मुस्काटदाबी, मारहाण, दुर्लक्ष
ह्यांचे हरघडी उबळत वर येणारे तेजाब
एका क्षणात बाहेर पडून मोकळं वाटणार असेल तर
रक्ताची एक सणसणीत उलटी व्हायलाही काय हरकत आहे?

Comments