लेझी बम्ज


आपले आईवडील आपलं नाव किती प्रेमाने ठेवतात पण ते मोठं होऊ लागल्यावर आवडतच असं नाही. कित्येकदा वाटतं की साला आपल्या आईवडिलांची नावं किती छान होती पण आपलं नाव ठेवताना का बरं ते आपल्या आत्या मावश्या काकवा नी आज्यांकडे सोपवलं. साला जगात आपल्याला आणताना आळस केला नाही पण नाव ठेवताना मात्र घिसाडघाई. मला अरूंधती, वैजयंती, शालिनी ही नावं खूप आवडतात. रेणुका हे काय नाव आहे. श्शी बंडल मला अजिब्बात आवडत नाही. 😏 रेणुकादेवी ही कुलस्वामिनी म्हणून ते नाव. माझी एक मामी मला अंबिका म्हणायची. तेही किती छानै.
आईचं नाव मधुबाला आणि बाबाचं प्रभाकर.. तेव्हा काय कायरा, करीमा, मिष्का, फात़मा.. फातिमा नाही हं.. फात़मा मिहिका, अानंदिता अशी नावं माहीत नसतील आईबापाला.. पण कोकिला वगैरे अप्रतिम सुंदर सेक्सी नावाच्या आमच्याच वयाच्या स्त्रिया आहेत हो.. त्यांच्या पालकांना बरं सुचलं ते. आमच्या पालकांना फक्त चिमणी माहीत होती का?

Comments