काडेपेटी

सोडून गेलेल्या पुरषाला वाटतं
चला..तुटले एकदाचे पाश
एकार्थी झालं ते बरच झालं
एखादा ऑड मॅन आऊट क्वचित हळहळेल
पण रात्री झोपल्यावर दुसर्या दिवशी मस्त टनाटन साला
आम्ही स्त्रिया मात्र
सगळ्याची बेगमी करून
पुरवून उरवून आरामसे चवीचवीने खाणार्या
आमचे हात काडेपेटी सारखे इतकेच मानूया भले
त्यात आसपास नसलेल्या त्या आवडलेल्या कित्येक पुरषांचे
तलम रेशमी श्वास मावतात
ते रेषा रेषा भाजतातही आणि आम्हांला हवं तेव्हा
लपेटून घेतात घट्ट घट्ट ऊबदार मिठीत
गरज रहात नाही सोडून गेलेल्या पुरषाची किंवा त्याच्या सावलीचीही |

Comments

Post a Comment