सुरूंग

तू फुटून जाशील
हे वाटतं ना तुला कधीतरी..
असं काय भरलेलं आहे तुझ्याआत ज्वालाग्राही?
असंख्य रस्ते बुजलेले आहेत तुझ्यासाठी
बरं.
मग तेच उडवून देण्यासाठी
लाऊन का टाकत नाहीस एखादा सुरूंग?

Comments