फुगेवाले बासरीवाले

इथे फुगेवाले खूप झालेत
आता काही दिवसांनी बासरीवालेही पण येतील
मादामुझेइल..
पुरषाची हाक आली की नेसण सोडून धावत जायचं नसतं..
आपण जात्याच किचकट आहोत
कठीण आहोत
अप्राप्य आहोत म्हणून आस असते त्यांना
शरीराकडे येणारे रस्ते सोपे नसावेत
आपलं वैयक्तिक आयुष्य आणि
आपल्याशी जोडल्या गेलेल्या माणसांच्या भावना 
खुलेआम भंगारात काढणारे भंगारवाले
फुगेवाले, बासरीवाले, मवाली अश्यांना
' प्रवेश निषिद्ध ' ची पाटी ठसठशीत दाखवायला वेळ लागता कामा नये
मजा येते.

Comments

  1. Jyachyashi lagn zalay to fugewala, basariwala,bhangaarwala ahe ase nantar samajale tar....

    ReplyDelete

Post a Comment