नकार

खूप वर्षं लोटली तू मला नकार देऊन
तुला पाहून तर कित्येक दशकं लोटली
पण अजूनही टराटर फाडून टाकते 
नकार ऐकलेल्या क्षणाची आठवण मला
माझ्या उसवलेल्या जिवाच्या तुकड्यातून
आजही ठिबकत राहतं तुझं झलकअत्तर
तुला माहितही नसेल..
आजही चढत राहते पहिल्या प्रेमाची व्हर्जिन नशा मला
आजही आठवत राहतेस तू मला..
त्या तशाच एका वळणावरती !

Comments

  1. माझ्या उसवलेल्या जिवाच्या तुकड्यातून
    आजही ठिबकत राहतं तुझं झलकअत्तर

    ReplyDelete
  2. आजही आठवत राहतेस तू मला..
    त्या तशाच एका वळणावरती !..Pravin..

    ReplyDelete

Post a Comment