Don't Worry. Be Happy.




काय झालं आज मूड डाऊन. काल उठला नाही का तुझा ? लायटर दे रे, आहे ?
काल गेलोच नाही तिकडे. घरीच गांड लागली. अरे..
काय.. बोल
अं.. माझ्या आईचं अफेअर आहे रे. मला तिचा खून करावासा वाटतोय. हललोय मी. काल मी स्वत: बघितलं. साला आपल्याला दुसर्यांचं बघायला मजा येते. पण माझ्या आईला दुसर्याच्या मिठीत बघून डोळे गरम होऊन फुटतील असं वाटलं.
फक.. पण ओ.. अरे रडू नकोस रे. ए कमॉन. अरे रडू नकोस. बोलू आपण.
बाबा किती गरीब प्रेमळ माणूस आहे, ती असं कसं करू शकते.. माझी आई?
मग आता..
भेंच्योत, मी जाऊन विचारणार तिला स्ट्रेट.. ती असं करूच कसं शकते.
तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते नं.. तुझा जीव आहे तिच्यात. नको विचारूस..
अरे चुत्या.. ती तसं माझ्या बापावर पण प्रेम करत होती असं मला वाटायचं अत्तापर्यंत.
ते ती करतच असेल..
मादरचोद, इथे गांड लागलीये माझी. तिने सरळसरळ फसवलंय आम्हांला.
कसं?
कसं? काय कसं?
तुझ्या आईचं वय सहज ४० च्या पुढे असेल ना अत्ता.
हो ४८. ह्या वयात ती असं कसं काय करू शकते. तिला लाज वाटायला पाहिजे.
कसली लाज.. करू शकते नं. हे तू ठरवू शकत नाहीस. तिच्या आणि तुझ्या वडिलांच्या नात्यात काही प्रॉब्लेम असतील. किंवा नसतील. ती मोहात पडली असेल. ती माणूस आहे बॉस.. घे.. दम मार.
प्रॉब्लेम्ज आहेत नं. पण ते भोसडीच्या सगळ्याच नवराबायकोमधे असतात. आरे म्हणून असं आमच्यामागे हे धंदे.. हे असलं.. तिचं धाडस कसं झालं, मला नवल वाटतं..
धंदे.. नाय रे. काय बोलतोएस..? तू मोठा झाला आहेस आता. तोवर होती ती तुझ्यापाशी. आता तिला तिचं जगूदे. तिचं लाईफ आहे. ते तिचंही आहे.
मी विचारणार तिला, हाव कॅन शी..
हाऊ डेअर शी? असं जास्त आहे ह्यात भाड्या.. वेळ आली की ती आपणहून सांगेल, तुला तुझ्या बाबांना. किंवा काहीच सांगणार नाही. डोंट मेक हर ऑकवर्ड. ह्या एकाच गोष्टीमुळे तुझा तिच्याबद्दलचा आदर प्रेम एका क्षणात संपून जावा, असं तिने काही केलेलं नाहीये. आपण आपल्या आईबापाला हे सगळं करायला बाद ठरवतो. त्यातूनही ह्याबाबत तिच्याशी जे काही तावातावाने बोलायचं आहे ते तुझे बाबा बोलतील. तिच्या आयुष्यात थोडा आनंद आलाय दोस्त. तिला जगू दे. तिला गिल्ट देऊ नकोस. she is not guilty. nobody is.. तू काहीच झालंय असं दाखवू नकोस. आईबाप शेवटी आपल्या मुलांपुढे आपल्या सगळ्या इच्छा मारतात. तो शापच असतो पालकत्वाला लागलेला. आई कुठे जात नसते. जर गेलीच, तर तिला थांबवू शकत नाही आपण हे समजून घे. so chill. don't worry be happy. तुझं काहीच बिघडणार नाहीये चुतिया.
 इतका हलू नकोस. घे.. दम मार..

Comments

  1. असा प्रकारचा किंबहुना जणू अस्साच प्रत्यक्षच माहीत आहे...पण मुलाने सहन केलं अश्या आईला ...कारण तिच्या नंतर तिच्या नावावरील असलेला किमान दिड कोटींचा बंगला त्याला च मिळणार होता 😢

    ReplyDelete
  2. ती बाई हे का करते हे समजून घेण आवश्यक आहे.. केवळ क्षणिक वासनेपोटी करत असेल आणि तिथेच विसरत असेल तर ठीक .. वापरा आणि विसरा .. क्षणाची तृप्ति पुढे काही दिवस शांतता .. वयानुसार ..पण हे रोजच झाल आणि उत्कट, अनिवार , आवश्यक झाल तर मात्र अवघड आहे.. नैतिक, सामाजिक आणि कौटुम्बिक सुरक्षेच्या दृष्टीने ...

    ReplyDelete

Post a Comment