हाय हाय ये जालिम जमाना

खूप नाचानाच करून आपण हौशीने एकादा ड्रेस आणतो तेव्हा घरी आल्यावर मरणाचे थकलेलो आहे ह्याची जाणीव होते. पण आमच्या घरी प्रथा आहे. म्हणजे माणूस बाजारातून शहीद होऊन त्याचा आत्मा थकून लोंबकळत घरी आला असला तरी त्याने ते सारे कपडे घालून फॅशन परेड करून दाखवावी लागते.
पाच तास फिरूनही मी एक किंवा अर्धा ड्रेस घेते. उरलेलं उद्या आणायला जायचय अस असतं. कधी वरचच कधी फक्त बॉट्मस घेऊन घरी येते. तरी बरं मला शॉपिंग अजिबात आवडत नाही. मी शॉपिंगला क्वचित जाते. पण आज थकले होते. घरी आल्यावर नियमाला धरून फॅशन परेड करणे क्रमप्राप्त होते. मी जरा वेगळाच ड्रेस घेतला होता. एकदम सिंपल पण वेगळा.
निदान मी भयानक मरणी वाईट थकलेली आहे हे पाहून तरी समोरच्याने, हा ड्रेस घातल्यावर तू ' कैदी ' दिसते आहेस, असं म्हणायला नको होतं. 

मी नाही बदलणार हा ड्रेस. हूं. 

Comments