टकाटक

कुणीही कधीही विचारलं कशी आहेस की मी हेच सांगते, एकदम टकाटक. मग भले मी त्या वेळी अगदी रद्दी अवस्थेत असले तरीही ते समोरच्याला कळता कामा नये. त्याला भारी वाटलं पाहिजे आपल्याकडे पाहून, आपल्याशी बोलून आपल्याला ऐकून. मरेपर्यंत हे असच रहावं. 
मरतानाही खूप ढासू दिसलो पाहिजे आपण. ओठांवर हलकी लिपस्टिक, त्यात खोचलेली सिगारेट (वाचणार्यांसाठी ऑप्शनल ), मस्त लांबलचक चांदीचे कानातले ( सोनं आवडत नाही ), डोळ्यांत भरपूर काजळ, छान रंगीत कपडे, त्यावर पर्फ्यूमचा दरवळ, हातात मोबाईल फोन त्यात फेसबुकवर लॉग इन स्टेटस, खूप उत्साहाने सुरू केलेलं आणि आपण परतणार ह्या आशेने वाट पहात असलेलं एखादं क्रीएटिव्ह वर्क, आपलं प्रेत जिथून उठेल ती मस्त आवरलेली, स्वच्छ प्रसन्न रोमॅंटिक जागा, त्यात आवडणारा थोडा आपला शिक्का असलेला गोजिरवाणा उल्टापाल्टा पसारा, तोंड न पाडता.. माझा मृत्यू झालेला असताही तिथेच मस्त गप्पा मारणारी, दम मारणारी, कटिंग पे कटिंग चहा - कॉफी मारणारी, छान टकाटक आवरून सवरून आलेली कलरफूल हसरी माणसं. त्यातल्या एकदोघांनी थंड पडलेल्या हातावर टेकवलेला ओठांचा मला न जाणावणारा पण हवा असणारा हलका थरथरता गरम स्पर्श. समोर चिकन चपाती असेल तर माझ्यासाठी आलेला कावळा इच्छा विचारत बसलेल्या माणसाचा डोळा चुकवून चोच मारायला निश्चित पुढे जाईल. गॅरंटी आहे आपल्याला. मेकअप करणं हा आपला अधिकार आहे बॉस. मरते दम तक. मरने के बाद भी. सगळं टकाटक पाहिजे. हाहाहा.काट

Comments

  1. गीत रामायणातल्या एका कुठल्याश्या गाण्यात गदिमानी लिहलंय, "मरण कल्पनेशी थांबे खेळ जाणत्याचा"
    किंवा कोणी तरी (बहुदा तुकोबा) लिहलंय, "आपुले मरण पाहिले म्या डोळा"
    आणि आता रेखो रेखाटत्येय एकदम टकाटक मरण.
    वास्तविक प्रेत म्हणजे कचरा. सुकलेली पुले सुध्दा कचराच, परंतु, त्याला आपण निर्माल्य म्हणतो आणि त्याची विल्हेवाट सन्मानपूर्वक लावतो. तसेच, प्रेत म्हणजे साधा कचरा नाही. एकेकाळी हसणार्‍या, बागडणार्‍या शरिराचे निर्माल्य म्हणजे प्रेत. ख्रिस्ती लोक प्रेताला छान टकाटक पोषाख चढवून, सुंदर पेटीत ठेवून स्मशानात नेतात.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. लहानपणापासून बाळकडू मिळालेलं असतं बटा काढू नयेत. आरशापुढे भिरभिरणं वाईट, नट्टापट्टा फक्त शाळेच्या gathering ला,
    टवटवीत दिसण्यात, आपल्याला योग्य वाटेल ते करण्यात काहीही गैर नाही. किंबहुना जोवर एखाद्याला आपण इजा (शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक वगैरे वगैरे) पोचवत नाही तोवर मन मारूच नये.
    मला मुक्तक आवडले.

    ReplyDelete

Post a Comment