मनोरूग्णांचे चेहरे

फेसबुक प्रेपिकला किंवा डीपीला आपला खरा चेहरा न लावणारे मनोरूग्ण असतात, असं नुकतच वाचनात आलं. एखाद्याला खोडून काढण्यासाठी त्याला डॉमिनेट करण्यासाठी त्याला पटकन मनोरूग्ण ठरवण्याची ही मानसिकता मला एक खोड वाटतो. हाही एक प्रकारचा मनोविकारच नसेल कश्यावरून? असे अनेक प्रोफाईल आपण पाहतो जे कधी कुणालाही त्रास देत नसतात, ना कश्याच्या अध्यात मध्यात नसतात. ते बरे की त्यांची वॉल बरी. आपल्या वॉलवर वाचतात कमेंट करतात. एखाद्या खरा चेहरा नसलेल्या अकाऊंटवरून कुणी आपल्या पोस्टवर ते पोस्ट पटत नसल्यास काही प्रश्न विचारले तर त्याला उडवून लावायचे, ती व्यक्ती काही उधम मचानेके हेतूसे काही करत नसेल तरीही तिला दुर्लक्षित करायचे, ह्यामागे काय विचार असतात? अनेकांना विविध कारणांनी आपली खरी ओळख दाखवायची नसते, दाखवता येत नाही. पण व्यक्त व्हायचं असतं. लिहायचं असतं, इथल्या लोकांशी बोलायचं असतं. फेसबुकवर लाखो करोडो फेक अकाऊंट्स असावीत. नक्कीच. ते सारे विकृत मनोरूग्ण कसे काय बुवा ?
इथे खर्या चेहर्याने वावारणारे कितीतरी विकृत खोट्या प्रवृत्तीचे लोकं दिसतात. त्यांचे खरे चेहरे त्यांचं शिक्षण समाजातलं स्थान एरव्हीचा वावर पाहून वाटतही नसतं की ही माणसं असं वागू शकतात..ते अचानक समजून येतं. असे हे खरे चेहरेही किती विश्वासहार्य आणि निकोप मनाचे मेंदूचे असतात? फटकन कुणालाही मनोरूग्ण म्हणणं मला फार ऑफेंडिंग वाटतं कुणासाठीही. म्हणू नये असं कुणालाही काही ठोस कारण हातात असल्याशिवाय. फार हीन कृती आहे ती. 

Comments

  1. हो ग बरोबरय तुझ...प्रत्येकाचे प्रोब्लेम्स वेगळे असतात ...

    ReplyDelete

Post a Comment