ए बये.. चिल मार

स्वार्थी संधीसाधू विकृत
लबाड धूर्त आतल्या गाठीची
हीन काळी लठ्ठ कुरूप
ओघळलेली सुटलेली
वरच्या जातीची खालच्या जातीची
वरच्या थराची खालच्या थराची
लुबाडणारी फसवणारी गंडे घालणारी
डोळे मारणारी अंग हलवणारी
बाजारू रांड वेश्या धंदेवाईक
रंगेल छिनाल बाजारबसवी
बालपण वाईट गेलेली
नवर्याने टाकलेली उकिरड्यावर फेकलेली
पोटार्थी लाभार्थी आश्रीत
हिजड्याची औलाद पांचाली
विधवा कुलटा पांढर्या पायांची वांझ इ.
हे शब्द आपल्या पाटीवर लिहून जातं कुणी
म्हणून डीस्टर्ब आहेस का तू बये?
छ्या.. चिल मार.
आपल्याला पुसता येते धुता येते पाटी
आपलं गाणं आपल्या गोष्टी लिहण्यासाठी
त्यांच्याकडेही आहे पाटी
लिहण्यासाठी जगण्यासाठी
पण त्यात ते कचरा गोळा करतात
अडाणी असतात. जौदे.

Comments