प्रियकर आपल्या मुलाचा बाप होण्याच्या लायकीचा असेलच असं नाही


मी ठरवून स्त्रियांविषयक लिहीत नाही. खरं तर स्त्रियांच्या दु:खाविषयी मी लिहूच नये असं आणि ते मी लिहावं इतकं मी बघितलेलं तरी काये असं मला वाटत असतं. पण स्त्री असल्याने बायडीफॉल्ट येतय होतय ल्हितोय. 
' तुझं माझ्यावर प्रेम असेल तर माझ्यासोबत झोप ', असं अगदी अप्रत्यक्ष तर कधी थेट सांगणारा प्रियकर शरीर संबंधांतून दिवस गेल्यावर स्त्रीला कॅरॅक्टरलेस ठरवत असेल, तर तो त्या स्त्रीच्या मुलाचाच काय एकूणच बाप होण्याच्याच लायकीचा आहे का ?
अशांवर आपण प्रेम केलं होतं हे विसरून त्यांच्या ढुंगणावर लाथही मारता येत नसेल तर मग तुम्ही कमकुवत आहात आणि राहणार. मग तुम्ही एकदाच का वारंवार गर्भपात करत राहणार. ज्याच्यावर प्रेम करता येतं त्याच्या मुस्काटात पण ठेऊन देता आली पाहिजे. आपण फसतो. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला सगळं देऊन बसतो. सगळं देतो म्हणजे सेक्स इ. करतो, ह्यालाच सगळं देणं म्हणतात सर्रास. मन दिलं नाही फक्त शरीराची गरज म्हणून सेक्स केलं दिलं तर सगळं नाही अर्धं दिलं असं म्हणायचं का? हाहा. होता है. आपण देव नाहीयोत.
मुलांना नादी लाऊन त्यांना टांग देणार्या मुलीही असतात की. फक्त पुरूष फसवणारे असतात आणि बायका नाडल्या जातात असं काही नाही. सेक्सनंतर पुरषांवर गर्भपात करायची वेळ येत नाही फक्त.. नाहीतर ते कॅरॅक्टरलेस आहेत असं म्हणणं आपल्यालाही सोपं गेलं असतं नाय का? पुरूष प्रेग्नंट करून सोडून देतात म्हणून आपण आयुष्यातून उठलो, असं काय मानून घेता? मन दुखतं. पण स्त्री आहोत आपण परत प्रेग्नंट राहणार नाही, असं काही होणार आहे का.. नाही. निदान ज्याचं मूल जन्माला घालू तो तरी आता धड शोधण्याची एक संधी पुन्हा मिळाली म्हणून ज्याम हॅप्पी व्हायचं. डान्स करायचा. ही रडण्याची नाही हसण्याची वेळ आहे.. वाचतेयस ना गं..?
एक खाडकन मुस्काडात द्यायची समोरच्याच्या. त्याच्या कानात पियानो वाजायला लागेल आणि आपली व्हर्जिनिटीही परत मिळेल. ट्राय करून बघ.

Comments

  1. .

    वाचतेयस ना गं..?


    हो ग..वाचले मी...speechles

    ReplyDelete

Post a Comment