पेट्ट पट्टे पोपट पुरूष पारसी इ. इ.


आपल्या शरीराला प्रेक्षणीय स्थळासारखे पुरूष पाहतात म्हणून टीका करण्यापूर्वी एक काय करायचं.. आपल्या ड्रेसची नेकलाईन आहे ना ती साडेपाच ते सहा इंच डीप ठेवायची ती आठ इंच नाही करायची मग खड्डयात जातात लोकं. शिवाय साडीच्या पदराला बाजारात अगदी स्वस्तात सेफ्टी पिन मिळते की नै ती लावायची. आपण पारदर्शक टॉप्स घालून त्यातून ब्रेसियरचे जे रंगीत पट्टे दाखवतो नं कधीकधी ते दुसर्यांना दिसावेत म्हणूनच ना.आम्हांला माहित्ये ही गंमत पॉपॉ.
मग उगाच चिडचीड नाही हं करायची. मला हवे तसे कपडे मी घालणार पुरषांनी मान खाली घालून चालायचं बघायचं नाही, असं नाही होत. पुरूष वासनांध असतात, ते वाकड्या नजरेने बघतात इ.. अहो मामी.. ते अंध नसतात. डोंगर दर्यांचं आकर्षण सगळ्यांनाच असतं नं म्हणजे असं कसं ? सणसणीत पुरषांकडे आपण बघत नाही का ? मी बघते बाई. का दाखवता मग तुम्ही ब्रेसियर्सचे पट्टे ? जवाब दो.. उगाच्च पुरषांना नावं ठेवावीत ती कश्याला. त्यांना डोळे असतात ते बघतात इतकंच. काही वाकून वाकून बघता. काहींच्या डोळ्याला स्कॅनरच लावलेले असतात. आपण पुरषांच्या छात्या स्कॅन केल्या तरी तिथे फक्त केसाळ जंगल मिळेल पेट्ट फिरवायला. आपला साला बायकांचा नशिबच वाईट. 

एकदा काय झालं.. बसमधे बसले होते आणि बस कूलर कं. इराण्याच्या इथे जॉम ट्रॉफिकमधे थांबली होती. फूटपाथवर मरणाची गर्दी. बसमधे गर्दी.. गाड्यांच्या हॉर्नचे आवाज.. पाऊस पडतोय.. अंगातून घाम वहात होता. नशिबाने FUCKत एक खिडको होता माझ्याकडे. बस थांबली होती. अचानक काय झालं.. काय झालं काय विचारता... त्या गर्दीत एक उंच, गोरा पुरूष चालताना दिसला मला.. पावसात भिजत भिजत हळूहळू गर्दीतून पुढेपुढे सरकत होता.. सगळ्या काळ्या छत्र्यांच्या समुद्रात तो एकटा तरंगत जात होता. लक्षवेधकच होता. एरव्ही मला गोर्या रंगाचं आकर्षण नाही पण त्याच्या चेहर्यात ना ट्यूबलाईटच पेटलेली होती. कसलं तेज होतं मेल्याच्या तोंडावर. .. कुरळे केस, लांबरूंद मोठे कान, गुडघ्यापर्यंत पोहोचलेले कडक हात, निमूळती बोटं, ब्राऊन कलरचा रेबॅन एव्हिएटर.. रूंद खांदे साला.. ताठ कणा.. सुरी फिरवली तर तिला धार येईन असं टोकदार नाक.. मग काय गरमच व्हायला लागलं. बसमधला क्लास्ट्रोफोबिया अंगावर चढायला लागला. मी बसमधेच माझी छत्री ठेवली आणि खाली उतरले.. तो एका पत्र्याखाली थांबला होता. मी भिजून घेतलं जरा. मग त्याच्याकडे गेले. तो सिगरेट पीत होता. मी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिले.. दोन मिनिटांनी त्याच्याकडे सिगरेट मागितली. तो मला म्हणाला. एक मिनिट थांब आणि मग तिथे मामा पानवाल्याकडे अर्ध्या मिनिटात जाऊन त्याने माझ्यासाठी डनहिलची सिगरेट आणली.. असं सगळं असतं ते.. काय करणार.
हे इथे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे. जाऊदे मरूदे मीच कन्फेस करून टाकते उगाच किती ते सारखं पुरषांना बोलणार आपण नै का? तो योगा इन्स्ट्रक्टर होता. तर्रीच.. आणि प्लस पारसी. हममम... इथेच थांबते.. उगाच त्याचा क्लास कुठे असतो इं. प्रश्न येऊ लागतील नैतर. गेला गेला तो लंडनला.
आम्हनून ब्रेसियरचे पट्टे दाखवण्याचा, शॉर्ट स्कर्टमधून ढोपरं दाखवण्याचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा काही संबंध नाही. 
तुम्हांला हौस आहे तुम्ही घाला. पुरूष मुद्दाम बघत नाहीत. नाईलाज असतो त्यांचा.
..
एखाद्याची चड्डी ब्रेसियर बनियानची चॉईसही कशी चुकीची आहे इथंवर घुसायला मागेपुढे न पाहणार्या व्यक्ती कोणे एके काळी आपल्याला आदरणीय वाटत होत्या हे जाणवून आपला आपल्याबद्दल वाटणारा आदरही धोक्यात येऊ लागतो. कुणाहीविषयी वाईटासोबत चांगले मत पटकन करून घेण्याने आपला पोपट होतो. माझे एकदम एकडझन पोपट एकसाथ झालेत अनेकदा. किती मी बिचारी, किती मी चांगली, किती मी भोळी, किती मी बौळट.
..
एक आगव टीप : कॅनव्हाससारखे पट्टे असलेल्या ब्रेसियर वापरणार्या स्त्रियांच्या आयुष्यात रंग कधी येणार ? तोलून धरणार्या गोष्टींवर स्त्रियांनी वेळ आणि पैसा खर्च केला पाहिजे. काही गोष्टी महागड्या असाव्यात कारण त्याचा पहिला आनंद आपल्यालाच मिळतो.

Comments

  1. काय मस्त लिहिलयस.. हसु आलं आणि काही साक्षात्कारपन झालेत.. हाहाहा..

    ReplyDelete
  2. न वाचता रागावणार होतो!एक बिचारी म्हण अशी आहेः बाईला खूष कसं करावं हा एक गहन प्रश्न आहे; पुरुष काय, बाई दिसली की खूष!

    आता, वाटतेच बाई प्रेक्षणीय, याला पुरुषांचा काय इलाज? हे जेनेटिक की सांस्कृतिक, हे अजून ठरलेलं नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. असतात बघण्यासारख्या बघतात पुरूष आणि स्त्रियाही बघतात. हाय काय नी नाय काय. हाहाहा.

      Delete

Post a Comment