आई

बेबी - उद्या आई येणार आहे.. लंचसाठी काय बनवायचं..
चंग्या - मी नाहीये उद्या.
बेबी - इतका इंस्टंट रीप्लाय.. तेही आज शनिवार उद्या रविवार आणि तू मला रात्री साडेअकराला सांगावसं.. तू उद्या घरी नाहीयेस हे तुला अत्ता आठवलं की काय..
चंग्या - उद्या पुण्याला जायचय. महत्वाचं काम आहे. नशिब यार अत्ता आठवलं.
बेबी - बरं मग तसं कळवून टाक तुझ्या आईला की तुला वेळ नाहीये उद्या म्हणून. अत्ताच फोन कर. बिचार्या इतक्या लांबून लेकराला भेटायला येतात. त्यांचा हिरमोड व्हायला नको.
चंग्या -  माझी आई येणारे.. ? ओ ओ
बेबी -  आयला..  जसं मगाशी उद्याच महत्वाचं काम असल्याचं तुला आठवलं तसं ते कॅन्सल झाल्याचही अत्ता कळलं असेल नं तुला. 

Comments