चड्डीमैत्रीण

My dear Friend
मी तुझ्या जिवाला जीव देईन डुकरे
कारण माझं तुझ्यावर प्रेमय प्रेम.
पण भडवे..
शक्यतो तुझ्या लफड्यात मलाच घोडे लागणार नाहीत
ह्याची काळजी घेतलीस
तर तुझं काय घोडं मारलं जाईल?
चांडाळणे..
तू बाहेर शेण खातेस
तू गू खातेस
तू लफडी करत्येस
माझ्या जिवावर !
आईबापाशी नवर्याशी भावाशी खोटं बोलतेस
थोबाडे मुस्काडतोंडे
बॉयफ्रेंडला राखीव ठेऊन
आपल्या बाकीच्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्सवरही वास मारतेस
डुचके वासाडे कुत्रे
माझ्या बॉयफ्रेंडचाही तू एक दिवस
टवूक मारशील ह्यात मला शंका नाहीये
तुला काय झक मारायची ते मार गं माझे राणी
पण त्यासाठी तुझ्यावर प्रेम करणार्यांची अश्शी बूच मारून
स्वत: सोड्यासारखी फसफसून उडू नकोस
तुझं भांडं फुटेले ह्या भितीने आम्हां मित्रमैत्रिणींची
भितीने चड्डी ओली होते.
तू आमच्या घरी आलीस असं सांगून येतेस बिंधास्त
पण तू नक्की कुठे तोंड काळं करायला गेलेलीस
हे देखील आम्हांला धड सांगत नाहीस
तू ज्यांचे ज्यांचे घेतेस... त्यांचा एकही पापा आम्हांला मिळत नाही
पण तुझ्या पापात तरीही आम्ही सहभागी मायला !
आणि
त्यात तुझ्या बापाचा फोन येणार, '' पिंकू कुठे गेली तिला फोन द्या..''
त्यांचा सुरीदार आवाज ऐकला की
आम्ही लढवत असलेल्या खिंडीची गांड फाटते
'' काका.. पिंकी संडासला गेली '', असं किती वेळा सांगणार?
किती वेळा किती वेळा.. ?
अश्या वक्तास आम्हांस आमच्याच आईचे नव्हे, त्तर
न प्यायलेले वाघिणीचेही दूध आठवते
पण तर्ही मी मागे हटणार नाही
कारण तू माझी चड्डीमैत्रीण आहेस
तुझ्यासाठी साला कायपण.


Comments