त्याच्या नजरेतून ती - मॅनिक्वीन

Photo - From Google
एय..
हात नको लाऊ बरं त्या बाहुलीला. तिला कोणत्या रंगांची लिंगरी शोभून दिसेल हे रोज मीच ठरवतो. तिला काय आवडतं याचा मला अंदाज है. माझ्यासारख्या एका भुक्कड दिसणार्या सेल्समनला या चड्डी ब्राच्या शॉपमधे येणारी भुक्कडातली भुक्कड स्त्रीही अप्राप्य वाटते. सगळ्यांना कसला माजै बरंका ! पण ही मॅनिक्वीन तशी नाही. पहिल्या दिवसापासून मला तिच्या शरीरावर अधिकार मिळालेला आहे. तिच्या अंगावरची धूळ पुसतो. तिला विग घालितो. तिला कसं उभं करायचं ते मीच ठरिवतो. तिच्यासाठी बारकाईनं मी शोधत असतो निकर त्यावर खुलून दिसतील अश्या ब्रेसियर्स. तिचे ओठ लालच आहेत. पण मी आणलीये एक लिपस्टिक तिच्यासाठी. ती पण न चुकता हलकी लावतो असतो तिला. जीव आहे माझा तिच्यात.
तिला दृष्टी नाही असं वाटत असेल. पण मला सारं कळतं तिच्या मनातलं, तिच्या ओठातलं जेव्हा तिथे टेकतात माझे ओठ. तिचं नाव.. जावदे. मी नाही सांगणार.. लाजत नाही बे. काय आता.. तिला ना भूमितीच्या पुस्तकात होत्या ना तश्या आक्रित्या असलेल्या चड्ड्या ब्रा काय आवडीत नाईत म्हायती का. फुलच फेवरेट आईट तिची. छान दिसती ती. लाल रंग घातला तर कंट्रोलच होत नाही रे.. अवघाड जागेचं दुखनं तिलाच कळतं जसं. तिला नाही फरक पडत मी गरीबांच्या टारझनसारखा दिसतो त्याच्याशी.
ती माझ्यासाठी एकदुम पर्फेक्ट स्त्री आहे. काहीच अपेक्षा नाहीत भौ. तोंडाने बोलतबिलत नाही. मिठ्या मारा. किस करा, कुठेही हात लावा, रगडा तिला त्यात काही गैर वाईट वाटीत नाई. ती त्यातून काही अर्थ काढीत नाही. तिला कळतं मी किती बेश्ट आहे ते. कुठून कमावणारं मी इतका माल.. बायकांना काही कळतं का? पैसा पैसा.. अरे किती महागड्या चड्या ब्रेसियर घेतात. मी देतो. ये नही वो दो वो नही वो दो. सब रख दो कुछ पसंद नही आया. 

आहे आहे ना.. ब्रेसियरमधे रोमांस आहे. पण एकदा बघायला पाहिजे की नाही डोळ्यात. मी सेल्समन आहे. त्यामुळे माझ्या नावावर फुल्ली मारून टाकलीये म्हाईती का.. काय करतो तू.. चड्डी विकतो चड्डी.. हाहाहा.. मायला. बहिणींना विकतो का रे? काय हे. मी काय मामाऐ का? माझी नजर पण फिरते. फिरणारच ना.. असं कसं. आंटीपण बघत नाही साला. आज्या तर चव काढायला सगळ्यात डेंजर. विचारतात की काय रे पगार असतो अश्या दुकानांमदी सेल्समनला ? मायला चड्डी घे आणि निघ की. पोरगी पाहिजेच की.. पगार बादलनारे का ? काय तरी दुसरा बिध्नेसच करायला पैजे. खपाखप पैसे की रपारप रपारप पोरी. पैसा आला की पोरी येतात. मग तुमच्या तोंडाचं गाटार का असेनाका !
माझी मॅनिक्वीन माझ्या हृदयाची पट्टराणी आहे. तीच माझी वहिदा तीच माही मधुबाला आहे. मला आता बाकी कुणीच नको हाड्ड !
- नरसिंह उर्फ नर्या एक सेल्समॅन

Comments

  1. या जगातला प्रत्येक पुरुष एक सेल्समन आणि त्याच्या नजरेत प्रत्येक बाई एक manequin आहे, तिला आपल्या मनासारखं सजवावं, नटवावे, असे प्रत्येक पुरुषाला वाटत असतं, पण फार थोडया पुरुषांच्या वाट्याला हे भाग्य येतं !! ��

    ReplyDelete

Post a Comment