आई

बरं झालं
मी स्वत: पाहिला
माझ्या आईच्या मरणाचा
बाजार करणारी माणसं
मी तिला पाहिलेलं नसलं
तरीही तिच्याबद्दल एकही
उणा शब्द काढणारा माणूस
मस्तकात जातो माझ्या
लेक म्हणून असं उसळून येणं
माझं रोंरावणार्या लाटांसारखं
त्या समुद्रतळाच्या अंधारातूनच
लख्ख बाहेर पडलेलं आहे
ही जाणीवच
माझे पाय दुमडून घेऊन जाते
मला पुन्हापुन्हा
तिच्या शांत प्राजक्त गर्भजलात
कणाकणाने आकाराला येण्यासाठी

Comments