आहे हे असं आहे


पुरषांचा ऑर्गझम झाट असतो. इझी. असेल असेल पण जिथे भावना गुंतलेल्या नाहीत तिथे ताट खाल्याचं समाधान मिळत नाही, हे त्यांनाही जाणवतं. लैंगिक गरजांच्या बाबतीत पूर्ण समाधान हे मृगजळ वाटावं इतकं काही अंतर पुढे पुढे जात राहिल्यासारखं भासत राहतं. पुरषालाही आणि स्त्रीलाही. एकमेकांसोबत काही काळ मन आणि शरीर दोन्ही खरवडून निघाल्यावर अंतरंग दिसू लागतं. एकमेकांमधले गुण दोष समजू लागतात आणि त्याच्याकडून तिला तिच्याकडून त्याला सर्व पातळीवर अधिकाधिक स्वीकार मिळू लागतो. ह्यालाच तू मला पूर्ण करतोस किंवा पूर्ण करतेस असं म्हणतात. हे जाणवण्यासाठी बराच वेळ जावा लागतो. क्वचित ते फार जलद जाणवतं. जाणवण्याचा अवधी किती आहे यावरून नातं कच्चं आहे या निष्कर्षाला येणारे परिपक्व नसतात. त्यांना सार्या कमिटमेंट शिक्का म्हणून आधीच हव्या असतात. अशाने परस्परांसोबत खूप काळ घालवला तरीही समजण्याची प्रक्रिया होणं अशक्य होते. तिथे फक्त किती कमिटमेंट, वचनं दिली घेतली ह्याच्या हिशोबाला महत्व उरतं.
शरीरं आखीव रेखीव नसतात. तरीही मन गुंतलेलं असताना तेही छान वाटू लागतं. त्वचा जशी मन होऊन जाते. त्वचेला हात लावण्याच्या पद्धतीनेही काय वाटतं हे व्यक्त होत राहतं. इन्व्हॉल्वमेंट हा फार मजेशीर इंटरेस्टिंग प्रकार आहे. कुणीही कुणाालाही कधीही कशासाठीही आवडू शकतं. त्यावर कुणाचाही अंकुश असू शकत नाही. त्याअर्थी फक्त एखादी स्त्री तिच्या देखणेपणामुळे पुरषाच्या जिवाला कापू शकते. तो तिच्यासाठी ढोपरं टेकून जमिनीवर बसू शकतो आणि ती त्याचा स्वाभिमान पायदळी तुडवूही शकते. तीच सुंदर स्त्री बेडमधे एखाद्या प्रेतासारखी पडून राहू शकते गपगार. मग काय करेल हो तो पुरूष तिच्याशी? कसा प्रणय करेल.. तसंच पैशाच्यामागे धावणार्या पुरषाला हातात हात घेऊन बसून बोलण्याचा वेळच जर नसेल तरीही काय अर्थ, फायदी आहे आखीव रेखीव शरीराचा? फक्त मनाचा संबंध असतो. फक्त मनाशी मन जुळणं महत्वाचं असतं बस्स.
प्रणय व्यक्त कसा करावा हे शिकण्यात आणि त्याच्यातल्या जागांचा ढांडोळा घेण्यात वर्ष निघून जातात. काहींना त्यात रस असतो ते प्रयोगशील असतात आणि त्यामुळे मजा येऊ लागते. एकमेकांमधे गुंतणं सोपं होऊ लागतं. काही याबाबत मन आणि शरीर सर्व पातळ्यांवर मिशनरी पोझिशनमधेच राहतात. त्यामुळे निरस होतंयस वाटू लागतं. तिथेही भावना असतात. काहीतरी मिसिंग आहे, हे वाटू लागल्याबरोब्बर मात्र ते शोधण्याचा प्रयत्न केला तर सततच्या मिशनरीतलाही तोचतोचपणा संपून जातो. 
सुरवातीला प्रेमाने जवळ बसणारी बायको काही वर्षांनी येता जाता बोलताना हळूवार होते, हसून पाहते तेव्हा नवर्याला जे वाटतं त्याला रोमांसच म्हणतात. खूप वर्षं एकत्र राहिल्यानंतर प्रियकराचं प्रेयसीला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं जवळपास बंद होतं. तरीही तो अचानक असं काही तरी बोलतो की त्याने तिचं हसणं जे सुरू होतं ते तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर काढल्याशिवाय थांबत नाही. अश्या हलक्याफुलक्या क्षणांमधला गोडवा आय लव्ह यू च्या फार पुढचा आहे नाही का? काय बोललं की समोरचा हसेल किंवा लाजेल किंवा सुखावेल हे माहीत असणं आणि त्यासाठी केला जाणारा एक प्रयत्न किती रोमांटिक असतो. त्याच्या पद्धती भलेही पारंपरिक त्याचत्याच असतील पण त्याने कळी खुलते. आपल्यामुळे कुणाची कळी खुलते, ह्या भावनेतला सेक्स हा शरीराने होणार्या सेक्सच्याही फार पुढच्या पातळीवर जाऊन पोहोचलेला असतो. त्यासाठी आसुसलेले असतात पुरूष. असं सारं असताना आपल्या जोडीदाराचा इतर कुणाशी संबंध आहे, ही भावना फार दु:ख देणारी आहे. कारण तो जोडीदार बाहेर सुख शोधतो आहे याअर्थी आपण त्याचं मन आपल्याकडे ठेवण्यात कमी पडतो आहे, याने भाजतं.
शरीराचं काय.. किती स्त्रियांना आपल्या जोडीदाराकडून नेहमी ऑर्गझम मिळतो? नाही मिळत. पण त्यांच्यासाठी तेच अंतिम लक्ष्य नसतं. त्याआधीही मनाशरीराचं जे गुंतणं असतं ते कधीही विशेषच वाटत असतं. पुरषांचंही असंच असेल नं. लैंगिक गरजा भागत नाहीत म्हणून इतर स्त्रियांकडे जाणारे पुरूष हे काय फक्त सेक्ससाठी जात असतील का.. नाही. गेले तरीही ते फार टिकणारं नसेल. पुरषांसाठीही स्त्री इतकंच भावना गुंतलेल्या असणं महत्वाचं असतं. सेक्स हा त्यापुढचा टप्पा असतो. वन नाईट स्टॅण्ड हे अपवाद आहेत त्याला. हे असं केलं की त्याने घोर प्रतारणा केली असं मानून घेणारे चाईल्डिश वाटतात. आपल्याकडच्या अनेक मराठी चित्रपटांत असं दाखवलं गेलेलं आहे. कळत नकळत ह्या मराठी चित्रपटात अश्विनी भावेसोबत एक रात्र घालवल्याचे विक्रम गोखले जेव्हा आपल्या बायकोला सांगतो तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळतं.. आणि ती घर सोडून जाते. वॉव. नवरे प्रोग्रॅम्ड असतात का? तू बाहेर का गेलास.. हे जाणून घेणं का नाही? नवर्याला परत जिंकणं त्यासाठी काही करणं हे का नाही? हे सहन होणार नसतंच पण त्यासाठी ज्याने आपल्यासोबत इतकी वर्षं घालवली प्रेम दिलं त्याला चुकायला एक जागाही देणार नाही का क्वचित? नवर्याने प्रतारणा केली म्हणून रडणार्या भेकणार्या स्त्रिया एक बॅग भरून एका हातात मुलाचं बखोट पकडून त्यांना फराफार घेऊन जात आहेत. मग त्या लोणच्याचा बिझनेस सुरू करत आहेत.. हे असं का का दाखवतात आपल्या इथे. ही रीअॅलिटी नाहीये. चित्रपटांनी नातेसंबंधांचे काही खुंट पुरलेले आहेत आपल्या डोक्यात. कठीण आहे.
नवर्याकडून शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून दुसरा जोडीदार पाहणार्या स्त्रियाही आहेत. पण त्यामुळे त्यांचं त्यांच्या नवर्यावर प्रेम नसतं का, ते संपतं का? समोरच्याला शिक्षा देणं फार सोप असतं. मग काहीजण आपल्या बायकोला घटस्फोटच देतील. काही म्हणतील की ठीक आहे तुला जो आवडतो त्याच्याकडे जा किंवा तिचा खूनच करू टाकतील. पण आपलं काय चुकलंय हे नीट तपासून का पहायचं नसतं...? समोरच्याला दोष देतोय. बरंच झालं त्याने आपले दोष झाकले जाणं महत्वाचं होऊ लागतं इतकं की हातात जणू कोलितच मिळतं आणि मग सहाजिक समोरच्याला शिक्षा देण्याचे अधिकार घेतले जातात.
माझ्यावरच प्रेम केलं पाहिजेस, असा आग्रह धरणार्या स्त्री किंवा पुरषांच्या पझेसिव्ह असण्याचं कारणही प्रेम हेच आहे नं? आत दुखत रे.. सहन नसतं होतं. जोडीदाराला मुभा देणारे किंवा त्यांना आपल्याशीच बांधून ठेवण्याचा आग्रह करणारे यांच्यात कुणाचं प्रेम जास्त श्रेष्ठ हे कसं ठरवणार.. उदा. क्वचित एखादी स्त्री दुसर्या पुरषाकडे गेली तरीही तिला तिच्या नवर्याचं कुणामधे गुंतणं पाहवेलच असं नाही. ह्याला लोकं दांभिकपणा म्हणतात. तसं नसतं ते. इमोशन्स ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधे दाखवता येत नाहीत. फक्त कठोर होऊन निर्णय घ्यावे लागत असतात. मन साला संपत नाही. आत दुखत राहतंच. इतकं व्यावहारीक रहायचं असेल तर प्रेम करावं पण प्रेमपत्रं लिहू नयेत. कारण त्याने आठवणी तयार होतात. ज्यांना न गंजण्याचा शाप असतो. त्या फेकून देता येत नाहीत. मला कुणीच चुकीचं वाटत नाही. सारे सारे जजमेंटल व्हायला पहात असतात ती वेळ अद्याप त्यांच्यावर आलेली नसते म्हणून असेल.
घरात सुख मिळत नसेल म्हणून पुरूष बाहेर जातो, हे किती रटाळ आहे. घरात सगळी सुखं मिळत असतानाही पुरूष बाहेर जातात स्त्रियाही जातात. शेवटी कुणाला कुणापाशी थांबायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे. शरीरापेक्षा जिथे निवांत होता येईल असं मन हवं असतं म्हणून हे होतं सारं. सारे सेक्ससाठी वखवखलेले नसतात. पुरषांना उगाच ह्यात बदनाम केलं जातं. खरंतरं पुरूष बाईइतकाच क्वचित जास्त हळूवार, समझदार असतो. बायकांच्या साड्यांना पदर असतात हेलकावणारे म्हणून त्यांचं कौतुक जास्त इतकंच.

Comments

  1. Atishay sundar. Khup haluwarpane vyakta kelyas bgavna

    ReplyDelete
  2. मला तर नवर्याकडुन ऑरग्याझम प्रेम वगैरे मिळुनही एक जण प्रचंड आवडतो टाळु नाही शकत त्याला... सेक्स किंवा ऑरग्याझम पलिकडे पण असाव काहीतरी .....

    ReplyDelete
  3. हे असं असावं.

    ReplyDelete

Post a Comment