गुलाबजाम

मी गुलाबजाम बघत होते. योगायोग पहा माझ्या शेजारी एक गुलाबीजाम बसली होती आणि तिच्यापास एक चमचा बसला होता. तिच्या गालाच्या प्लेटमधले गुलाबजाम संपता संपत नव्हते आणि चमचा चवीचवीने चवीचवीने ते सारे गुलाबजांबु चित्रपटातल्या नायकासारखेच डोळे बंद करून दी एन्ड होईपर्यंत खात होता. गुलाबजांबु मोठे गुबगुबीत रसरशीत असतील. खाण्यावर आपल्या मराठी लोकांचा फार फार जीव हो. ते चित्रपटगृहात होते पण त्यांनी चित्रपट पाह्यलाच नाही.. मला त्यांना सांगावसं वाटत होतं गेट आऊट. मी आपलं उगाच त्यांना त्रास द्यायला.. डीस्टर्ब करायला बाहेर पाणी आणायला जा, मधेच फोन करायला बाहेर जा असं करून त्यांच्या पायात पाय येतील ते त्यांना मागे पुढे करावे लागतील म्हणून उठून बाहेर जात तडमडत होते. अंधारात चालता येत नाही म्हणून फोनचा टॉर्च चालू करून तो पायाखाली मारताना मधेच तो प्रकाश मी त्यांच्या तोंडावरही खाचखूच करून येवं मारला. थोडा टाईमपास. 😀😀
गुलाबजाम पाहताना मी समोसे, स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मसाला कॉर्न खात होते. चित्रपट मस्त. पुन्हा पाहणार. आदित्यसाठी. त्याच्या दाढीसाठी परत एकदा. चौफेर लक्ष असलं की पैसे वसूल होतात.
नायकाच्या शर्टाला लावलेले सस्पेंडर तेवढे मला खटकले. म्हणजे गुरू शोधताना शर्टाला सस्पेंडर हे काय व्हॅलिड वाटलं नाही. पण गुलाबजाम हा विषय.. म्हणजे कथेसाठी एक छोटी थ्रेड चित्रपटासाठी पुरीएवढी मस्त टम्म फुगवण्यासाठी तिथे कुंडलकरसारखा सौंदर्याचा भोक्ता असल्याशिवाय जमणे नाही. त्याच्याशिवाय असा मस्त कूल चित्रपट मराठीत आणि कुणी बनवू शकला नसता. त्यावरची समिक्षाबिमिक्षा न वाचता जायचं हे ठरवलं होतं. तेच कामी आलं. नाहीतर डोक्यात नको ते राडे फुकट माजतात. बात खतम.



Comments