येडझवा

बाई मिळणार नाही म्हणून आईबापाचाही विचार न करता
आत्महत्या करायला निघालेल्या पुरषाला जगवण्यात
बाईला जराही इंट्रेस्ट नसतो
सो कॉल्ड मर्दानीपणाच्या व्याखेत तावून सुलाखून निघालेला
सगळं फाट्यावर मारणारा, रांगडं प्रेम करणारा
अल्लड अवखळ बेफिक्कीर पुरूषच तिला खलास करतो
पाठलाग करणार्या पुरषापेक्षा ' मृगजळा ' चा पाठलाग करत
आयुष्य उद्धस्त करून घेण्याचा एक विचित्र हलकट नाद
ह्या समस्त मृगनयिनी मंडळाला असतो
आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी नव्हे तर
ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्याशी बाईने लग्नं करावं.
हे तिला कायम म्हणजे कायमच उशिराने उजाडतं
त्याला काय करणार दादा ? डेस्टिनी. नशिबच फुटकं इ. इ.
शिवाय
बाई अप्राप्य आहे म्हणून पेग रीचवत आसवं ढाळणारे पुरूष..
तुमच्यात काय मजाय ?
तिला पळवून नेण्याची भाषाही डंकेकी चोटपे
मिणमिणार्या क्षीण लॅम्पोस्टसारखी मळकट वाटते
पुरषाचं दु:ख डोळ्यात दिसतं ते तिथेच थांबाव
सुंदर वाटतो पुरूष कवडश्यांच्याआतला
डोळे ओलांडून बाहेर पडलेले पुरषाचे अश्रू
तेही एक स्त्री मिळाली नाही म्हणून..
स्वाभाविक असतात पण ते त्याने लपवावेत तिच्यापासून
तू नदीत उडी मारलीस तर मला पोहता येत नाही
तू दरीत उडी मारलीस तर मी काय
तुझा हात पकडायला यायची नाही
वरून खाली पाहिलं की व्हर्टिगो आणि
खालून वर पाहिलं की मला खाल्तिगो होतोय
तू विष पिऊन मेलास तर
चिठ्ठीवर माझं नाव न लिहिता मर
तू भले वाईट कवितेत माझं नाव लिहून मला बदनाम कर दोस्ता
पण आत्महत्येच्या चिठ्ठीत मला सेलिब्रिटी करून जाऊ नकोस
त्यापेक्षा तू जग म्हणजे मी तुला क्रूर वाटू लागेन
मग कोणती ना कोणती बाई मिळेलच तुला
मी काय न ती काय
वरती दोन आणि खालती एक असलं की पुरतं पुरषाला
असं एक थोर पुरूषच म्हणून गेलाय
तू खरच गचकलास तर वाईट वाटेल हं मला
पण मनाला घरं पाडून घेत भोकाड पसरणारी बाई नाहीये मी
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये
ना तुझ्याबद्दल काही आपुलकी दयामाया आहे मनात
मग मला सांग
माझ्यासारख्या बाईसाठी आत्महत्या करण्याचे
चुतिया विचार का येतात तुझ्या मनात ?
चुरगळलेल्या कागदाच्या बोळ्यासारखी
फार्फार तर मी चार दिवस तुला वापरून सोडून देईन
माझ्यासाठी गांडूळासारखा आसवांमधल्या मिठाने तडफडून मरू नकोस
उठ गळपटू नकोस ह्यावर मी नाही कुणी एक दुसरी ताई मिळवणं हाच ईलाज आहे
पूस डोळे पूस तो शेंबूड.. बॉर्न येडझवा आहेस का तू ?

Comments