लुप्त

एय, साले चिडलीस तर
तुझी हाडं मोडतील इतकी
मजबूत मिठी मारेन मी तुला
एय, साले अबोला धरलास तर
रक्त काढणारं कडकडून चुंबन घेईन
मी तुझ्या ओठांच.

माझ्याकडे पाठ फिरवलीस तर
तुझ्या खोल गेलेल्या मणक्यावरून
अव्याहत केस फिरवत राहून
तुझ्या रोमारोमात घुसेन मी आतवर
कंट्रोलफ्रीक झालीस एकसारखी तर
तुझ्या घराखाली येऊन दारू पिऊन
तमाशा करेन भोसड्यात गेली दुनिया

माझे फोन कट केलेस तर
व्हॉटस अप वर सतत मेसेज टाईप
करेन आणि ते सतत डीलीट करेन
मग तुला टायपिंग टायपिंग असं दिसेल
आणि तुझा संयम तुटून फुटून जात
तूच मला वैतागून फोन करशील

हा सारा छळवाद करून काय मिळवणार आहेस?
मनातून मला काढून टाक
बघशील.. एक दिवस चिघळून चिघळून
तू दिलेल्या सार्या जखमा जीव घेतील माझा
आणि तेव्हा गृहीत धरायला माणसात मिळणार्या जागा
डोक्यावरच्या छपराइतक्याच महाग झाल्यात आजकाल
त्या जपून ठेवाव्या जिवापास
असं सांगत तुझं प्रतिबिंबही पुसट होत लुप्त होईल आरश्यातून.

Comments