फेंदर्या


डासुल्या माझं रक्त पिऊन
कसा सुखात पाय पसारून बसलेलाएस
तुझ्या बापाचं घर आहे का हे भाडखाऊ
तुला काहीच भीती नाही वाटत मरणाची..?
पण
तुला बघून तर आमची गांड फाटते
देव पण सॉलिड आहे
ह्या जगातल्या सूक्ष्म चिरकूट वाटणार्या जिवांना
त्याने विषकुप्या देऊन ठेवल्या
त्यापुढे सर्वशक्तिमान कोलॅप्स

मी टपरीवर कटिंग मारत बसते
बारमधे जाऊन जशी निवांत बिअर पीत बसते
तशी तू माझ्या रक्ताचे नीट पेग मारत बसतोस
रक्त घेतोस त्यासोबत माझ्यातला
राग खदखद आत लाव्हा सारखे उसळणारे आकांत
नतद्रष्ट आठवणी मला खंगवणारे आजार
हे सारंही का सक करत नाहीस
माझ्यातला मेद चरबी अंगातली मस्ती
ही का उतरवत नाहीस?
बेडरूमच्या एसीच्या गार गार हवेत झोपायचं
रात्री आमचं गोडगोड रक्त पोटभर प्यायचं
मजाय तुझी लेका
सकाळी तुझ्या डोळ्यावरून झोप जाता जात नाही
माझ्या रक्तकणाला अवगुंठून बसलेल्या
तुझ्या निवांतपणाचा घोट घेणार मी आता
माझा सोंडचावा घेण्यापूर्वी जसे तुझे डोळे चमकत होते
तसेच माझेही डोळे चमकताहेत आता
तू काय पहिला आहेस काय रे फेंदर्या ?
पण तुझ्यासाठी मी शेवटची ठरणार आहे
फटॅक्क.

Comments