G I F T

चंग्या - बोल बेबी बोल. आज तेरा दिन है.. बोल राणी तुला काय पाहिजे.. तू जे मागशील ते देईन.
बेबी - खरच म्हणजे खर्रच्चच..
चंग्या - तू फक्त माग गं.. तुलाही कळेल किती दिलदार नवराय तुझा..!
बेबी - आपलं लग्न झाल्यानंतर मी मोजून चार अफेअर्स केली. एकेक तुटत गेलं तसं नवंनवं होत गेलं... मला हे सारं सांगायला भीती वाटत होती. तुला काय वाटेल, तू कसा रिअॅक्ट होशील.. मला तुझ्याकडून बाकी काही नकोय. आता मला फक्त अभय पाहिजे.
चंग्या मट्कन खाली बसतो. टोटल शॉकमधे. डोळ्यात पाणी. अश्रुंचे दोन ड्रॉप्स खाली पडतात. मग एक दीर्घ जाड उसासा टाकून..
चंग्या - हं दिलं अभय. मी विसरून जाईन हे सारं..
बेबी - अरे नाही तसं नाही. आता मला ' अभय ' पाहिजे.

Comments